जेवण नव्हतं, 20वर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्रीची करोडोंची संपत्ती

सिनेमाच्या रंगीबेरंगी जगात, प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळं असतं. अनेकांना सुपरस्टारपर्यंतचा प्रवास करायला फार मेहनत घ्यावी लागली आहे.अशीच एक अभिनेत्री आहे जिने लहानपणापासूनच संघर्ष करत आपलं करिअर घडवलं आहे. हॉटेलमध्ये 500 रुपयांमध्ये काम करण्यापासून ते एक वेळ जेवण करून दिवस करण्यापर्यंत तिने दिवस काढले आहे. पण आज ही अभिनेत्री कोट्याधीश असून टॉपची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.

जेवण नव्हतं, 20वर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्रीची करोडोंची संपत्ती
Samantha Ruth Prabhu
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 19, 2025 | 2:40 PM

भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री आहेत. पण त्यांनी या उंचीवर पोहोचण्यासाठी अनेक परिश्रम केले आहेत.कारण स्टारडम मिळवण्यापूर्वी अनेक सुपरस्टार्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे मग त्या अभिनेत्री असोत किंवा मग अभिनेते. प्रत्येकाची कहाणी ही वेगवेगळी आहे. अशीच एक अभिनेत्री आहे जी आज टॉपची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण एक काळ असा होता की या अभिनेत्रीला दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नसायचे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि उदर्निवाहासाठी अगदी लहान वयातच काम करावं लागलं.

8 तास कामाचे फक्त 500 रुपये मिळायचे…

हे काम एका हॉटेलमध्ये असून या कामाचे तिला फक्त 500 रुपये मिळायचे. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड अन् दक्षिणेतील सुपरक्वीन समांथा रुथ प्रभू. समांथाने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. समांथाने तिच्या पहिल्या नोकरीबद्दल आणि पहिल्या पगाराबद्दलही सांगितलं आहे. अकरावीत शिकत असताना ती एका हॉटेलमध्ये होस्टेस म्हणून काम करायची. त्या काळात, त्यांना एका कॉन्फरन्ससाठी 8 तास काम करण्यासाठी 500 रुपये मिळत असत. ती म्हणाली की, ‘मी एका हॉटेलमध्ये एका कॉन्फरन्ससाठी होस्टेस म्हणून 8 तास काम केलं आहे आणि त्याबदल्यात मला 500 रुपये मिळाले. तो माझ्या आयुष्यातील पहिला पगार होता.’ ही माझ्यासाठी खूप खास आठवण आहे.

दोन वेळच्या जेवणाचीही होती अडचण 

एवढंच नाही एक वेळचे जेवण परवडेल अशी परिस्थितीही तिच्यावर ओढावली होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी कमीत कमी दोन महिने दिवसातून एकदा जेवत असे. मी अनेक प्रकारची कामे केली आणि आज मी इथे आहे. हॉटेलचं काम तिने आर्थिक अडचणींमुळे 20 वर्षे केल्याचंही म्हटलं. इतक्या लहान वयात सुरू झालेला समंथाचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यानंतर तिने या कामातूनन रजा घेतली आणि मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली आणि याच काळात तिला चित्रपट निर्माते रवी यांनी शोधून काढले, यानंतरच तिचा चित्रपटांमध्ये प्रवास सुरू झाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.


आज कोट्याधीश अभिनेत्री

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख बनली. समंथाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ मध्ये 3 मिनिटांचा आयटम नंबर केला होता. या 3 मिनिटांच्या गाण्यासाठी तिने तब्बल 5 कोटी रुपये घेतल्याचे वृत्त आहे. यानंतर, ती बरीच लोकप्रिय झाली. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या समंथाने तिच्या पहिल्याच चित्रपटाने ब्लॉकबस्टर हिट चित्रपट मिळवला. समांथा मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर इथवर पोहोचली आहे. आज तिची एकूण संपत्ती 101 कोटी रुपये आहे.

घटस्फोटानंतर समांथाची झालेली अवस्था 

यानंतर समांथा अक्किनेनी नागा चैतन्यच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न केले. मात्र काहीच वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. समांथाने या काळात समांथाने काही महिने चित्रपटांपासून ब्रेकही घेतला होता. त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन केलं आणि एकामागून एक प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसू लागली.

समांथाच्या कामाबद्दल

जर समांथाच्या कामाबद्दल बोलायचं तर, ती रक्त युनिव्हर्स या मालिकेत व्यस्त आहे ज्यामध्ये ती आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय, बंगाराम हा चित्रपट ती स्वतः तयार करत आहे आणि त्यात ती मुख्य भूमिका साकारत आहे. आरसी १७ – राम चरण-सुकुमार जोडी अभिनीत आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी समंथाचा विचार केला जात असल्याच्या बातम्या आहेत. तथापि, याबद्दल अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

जर आपण समांथाच्या कामाबद्दल बोललो तर, ती सीरीज ‘रक्त ब्रह्मांड’ मध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये ती आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय, बंगाराम हा चित्रपट ती स्वतः तयार करत आहे आणि त्यात ती मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच अनेक चित्रपटांच्या ऑफर तिला येत असल्याचं म्हटलं जात आहे.