Sana Khan : हिजाब सना खान हिला झालाय नकोसा? म्हणाली, ‘मला कळलं बुरखा घातल्यामुळे…’

Sana Khan : मनोरंजन विश्वाला अलविदा करत सना खान हिने बुरखा तर घातला, पण अनेक वर्षांनंतर म्हणाली, 'मला कळलं बुरखा घातल्यामुळे...', सध्या सर्वत्र सना खान हिच्या वक्तव्याची चर्चा... अखेर अभिनेत्री झाली व्यक्त...

Sana Khan : हिजाब सना खान हिला झालाय नकोसा? म्हणाली, मला कळलं बुरखा घातल्यामुळे...
| Updated on: Oct 31, 2023 | 8:39 AM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री सना खानने ग्लॅमरच्या दुनियेला सोडचिठ्ठी दिल्याने सर्वजण थक्क झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर आहे. इस्लाम धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेत्री कायम बुरख्यात दिसते. एकेकाळी ग्लॅमरस कपडे घालणारी सना खान आता चाहत्यांना कायम बुरख्यात दिसते. दरम्यान, सना खान हिने बुरख्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सना खान हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. बुरखा घातल्यामुळे मला कोणतीही अडचण येत नाही… असं वक्तव्य करत सना हिने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सना खान म्हणाली, ‘समोरच्या व्यक्तीला वाटतं बुरखा घातल्यामुळे अनेक अडचणी येतात. पण असं काहीही नाही. जेव्हा बुरखा घातला जातो, तेव्हा कळत नाही तुमचा चेहरा बांधलेला आहे. पूर्वी जेव्हा मी इतर बुरखा घातलेल्या महिलांना पाहायची तेव्हा मला वाटायचं श्वास कसा घेत असतील. पण जेव्हा मी बुरखा घालायला सुरुवात केली तेव्हा असं काहीही वाटलं नाही..’

पुढे सना खान म्हणाली, ‘बुरखा घालणं काही अवघड नाही. घालण्यासाठी लूज असतो. तुम्हाला केस सेट करावे लागत नाहीत… वेळेची बचत होते.’ एवढंच नाही तर सना खान हिने एक मोठं सत्य देखील यावेळी उघड केलं. बुरखा घालणाऱ्या महिला केस कलर किंवा हेअरकट करत नाहीत असा अनेकांचा समज आहे. यावर देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.

एक हेअरस्टालिस्ट सना हिला म्हणाली, ‘बुरखा घालणार आहेस तर, हेअरस्टाईलवर एवढा खर्च का करते?’ यावर सना म्हणाली, ‘मी बुरखा घातले म्हणून काय झालं, असं तर मग मला टक्कल करायला हवं? मी माझ्या पतीसाठी स्वतःला सुंदर ठेवते. स्वतःसाठी मी खर्च करते…’

‘आपण पैसे खर्च करतोय आणि ती गोष्ट लोकांना दिसत नसेल तर, का खर्च करायचा असे अनेकांचे विचार असतात.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सना खान हिचा पती अनस म्हणाला, ‘पूर्वी अनेक गोष्टी सना हिला लोकांना दाखवायच्या असायच्या… पण आता अनेक गोष्टी ती खासगी ठेवते…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सना खान हिची चर्चा रंगत आहे.