Sanchita Ugale Death : संचिता उगलेचे खासगी चॅट्स लीक, 2 दिवसात नेमकं काय – काय घडलं?

Sanchita Ugale Death : संचिता उगळेचे खासगी चॅट्स लीक, नक्की कोणत्या गंभीर परिस्थितीचा करत होती सामना, 2 दिवसात नेमकं काय - काय घडलं? अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Sanchita Ugale Death : संचिता उगलेचे खासगी चॅट्स लीक, 2 दिवसात नेमकं काय - काय घडलं?
अभिनेत्री संचिता उगळे
| Updated on: Jun 17, 2026 | 11:49 AM

Sanchita Ugale Death : अभिनेत्री संचिता उगले हिने फार कमी वयात कायमचा निरोप घेतला… संचिता डिप्रेशनमध्ये होती. तिचे एका डॉक्टरकडे उपचार देखील सुरु होते. आता तिच्या निधनानंतर अनेक आरोप होत आहेत. संचिता हिच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी इंडस्ट्रीच्या दबावामुळे तिने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे… असे आरोप केले आहेत. तर अनेकांचं असं देखील म्हणणं आहे की, तिला काम मिळत नव्हतं… याच दरम्यान संचिता हिचे काही चॅट्स समोर आले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचितने आपल्या घरातील एका बंद खोलीत स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी अभिनेत्रीला मृत घोषित केलं.

पोलिसांनी संचिता उगले हिच्या अपघाती मृत्यूची नोंद  केली असून, तपास अधिकारी या प्रकरणातील सर्व पैलूंची तपासणी करत आहेत. तिच्या कुटुंबीयांनी मृत्यूच्या कारणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिनेत्रीच्या वडिलांचे आरोप आहेत की, तिच्यावर मानसिक दबाव होता.

निधनापूर्वी तिला सतत त्रास देण्यात आला… इंडस्ट्रीतील काही लोकांचा तिच्यावर दबाव होता… ती घरात कायम त्रस्त असायची… दिसायला सर्वकाही ठिक होतं, पण ती आतून पूर्णपणे कोंडलेली होती. इंडस्ट्रीच्या दबावामुळे माझ्या लेकीनं स्वतःला संपवलं…

संचिता उगळे हिचे खासगी चॅट्स

संचिता उगले आणि तिच्या साइकोलॉजिस्ट याच्यामध्ये झालेले व्हॉट्सॲप चॅट्सही समोर आले आहेत. या चॅट्सवरून असं दिसून येतं की, संचिता आपल्या भविष्याबाबत चिंतेत आणि भीतीच्या छायेत होती. शिवाय, शुटिंगदरम्यान तिला डायलॉग्स लक्षात ठेवतानाही अडचणी येत होत्या.

चॅट्सवरून असं दिसून येत आहे की, संचिता तणावाखाली जगत होती आणि तिला पूर्वीप्रणामे अभिनय देखील करता येत नव्हता. याबद्दल तिने डॉक्टरांसोबत देखील संवाद साधलेला… उपचारानंतर देखील तिला स्वतःमध्ये कोणतेच बदल जाणवत नव्हते. डॉक्टरांनी तिला धीट राहण्याचा देखील सल्ला दिला.

अभिनेत्री मेघा शर्मा हिचा मोठा दावा

संचिता हिच्या निधानंतर मेघा हिने मोठा दावा केला आहे. ‘संचिता जानेवारी महिन्यापासून डिप्रेशनचा सामना करत होती आणि इंडस्ट्रीमधील दबाव तिच्या समस्येचं कारण नव्हतं…’ रिपोर्टनुसार, मेघा असं देखील म्हणाली, ‘तिला काही आरोग्य समस्या होत्या. ‘

मेघाने असंही सांगितलं की, संचितावर कामाशी संबंधित कोणताही दबाव नव्हता. या सर्व निराधार अफवा आहेत. काम ही तिच्यासाठी कधीच समस्या नव्हती, तसंच तिला या इंडस्ट्रीकडून कोणताही दबाव किंवा छळ सहन करावा लागला नाही. असं काहीही घडले नाही.’, असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Follow Us