AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहनंतर मुलावर वाईट परिणाम; मित्रांच्या त्रासामुळे आईसोबत परतला भारतात

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या.

शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहनंतर मुलावर वाईट परिणाम; मित्रांच्या त्रासामुळे आईसोबत परतला भारतात
Sania Mirza and Shoaib MalikImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 26, 2024 | 12:47 PM
Share

मुंबई : 26 जानेवारी 2024 | भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला. शोएबचा हा तिसरा तर सना जावेदचा हा दुसरा निकाह आहे. याआधी तिने गायक आणि अभिनेता उमैर जस्वालशी निकाह केला होता. सानिया मिर्झाची फसवणूक केल्याबद्दल भारत आणि पाकिस्तानातील असंख्य नेटकरी शोएबला ट्रोल करतायत. एका रिअॅलिटी शोदरम्यान शोएब आणि सनाची पहिल्यांदा भेट झाली होती. तिथूनच हळूहळू त्याच्या विवाहबाह्य संबंधाला सुरुवात झाली. आता एका पाकिस्तानी पत्रकाराने सानिया-शोएबच्या घटस्फोटाचा त्यांच्या मुलावर काय परिणाम होतोय, याबद्दलचं खळबळजनक वृत्त दिलं आहे. नईम हनिफ असं या पत्रकाराचं नाव आहे.

मुलगा इझानविषयी सानिया मिर्झाने फोनवरून माहिती दिल्याचं पत्रकार नईम हनिफने सांगितलं आहे. वडिलांच्या तिसऱ्या निकाहनंतर इझान मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त असल्याचं त्याने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर शाळेतील मित्रांकडून त्याला त्रास दिला जात असल्याचंही पत्रकाराने सांगितलं आहे. शाळेतील मित्र आणि इतर विद्यार्थी सतत इझानला त्याच्या वडिलांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारत आहेत. यामुळे तो आणखी खचला आहे. या कारणामुळे इझानला शाळेत जाण्याची इच्छा नाही. मुलाखातर अखेर सानिया त्याच्यासोबत हैदराबादला परतल्याचंही या पत्रकाराने सांगितलं आहे. सानिया आणि शोएब हे घटस्फोटापूर्वी दुबईत राहत होते. आता शोएबच्या निकाहनंतर सानिया भारतात परतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

2022 पासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. आधी मॉडेल आयेशा ओमरसोबत शोएबचं नाव जोडलं जात होते. मात्र तिने या चर्चा फेटाळल्या होत्या. त्यानंतर सानिया आणि शोएबने ‘द मिर्झा मलिक शो’मध्ये एकत्र भाग घेतला होता. शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहला त्याच्या कुटुंबीयांकडून परवानगी नसल्याचीही माहिती आहे. 2010 मध्ये शोएबने टेनिस स्टार सानिया मिर्झाशी निकाह केला. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सानियाने मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएब यांचा इझान हा मुलगा आता पाच वर्षांचा आहे. लग्नाच्या 14 वर्षांनंतर सानिया आणि शोएब विभक्त झाले आहेत.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.