AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर आयुष्यात मोठे वादळ, तरीही सानिया मिर्झा दररोज करते ‘हे’ काम..

Sania Mirza and Shoaib Malik divorce : सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचेही बघायला मिळतंय. दुबईमधून भारतामध्ये आता सानिया मिर्झा शिफ्ट झाल्याचे सांगितले जाते. सानिया मिर्झा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसतंय.

शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर आयुष्यात मोठे वादळ, तरीही सानिया मिर्झा दररोज करते 'हे' काम..
| Updated on: Mar 02, 2024 | 4:50 PM
Share

मुंबई : सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आले. सानिया मिर्झा हिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांनाच हैराण केले. शोएब मलिक याने थेट आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसरा निकाह केला. हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांना थेट धक्का बसला. काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्यामधील वाद हा टोकाला गेलाय. मात्र, त्यावर सानिया मिर्झा किंवा शोएब यांनी काहीच भाष्य केले नाही.

घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य न करता थेट तिसऱ्या निकाहचे फोटोच शोएबने शेअर केले. या निकाहनंतर शोएब मलिक लोकांच्या निशाण्यावर आला. फक्त शोएब मलिक हाच नाही तर लोक सानिया मिर्झा हिला देखील खडेबोल सुनावताना दिसले. हैद्राबादमध्ये अत्यंत शाही पद्धतीने शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हिचा निकाह पार पडला होता. सानिया आणि शोएबला चार वर्षाचा मुलगा देखील आहे.

सानिया मिर्झा हिने घटस्फोटानंतर अनेक पोस्ट या सोशल मीडियावर शेअर केल्या. सानियाच्या या पोस्ट बरेच काही सांगताना देखील दिसल्या. सानिया मिर्झाने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय. आयुष्यामध्ये इतके काही सुरू असताना देखील सानिया मिर्झा हिने एक गोष्ट करणे अजिबात सोडले नसल्याचे तिच्या या फोटोवरून दिसतंय.

सानिया मिर्झा हिने शेअर केलेला हा फोटो जिममधील दिसतोय. सानिया मिर्झा ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. सोशल मीडियावर व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. मोठ्या धक्क्यानंतरही सानिया मिर्झा ही परत जिम करताना दिसत आहे. आता सानिया मिर्झा हिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सानिया मिर्झा ही लग्नानंतर भारत सोडून दुबईला शिफ्ट झाली होती. अनेकदा दुबईतील व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता घटस्फोटानंतर परत सानिया मिर्झा ही भारतामध्ये शिफ्ट झालीये. बऱ्याचदा सानिया मिर्झा ही सोशल मीडियावर मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर करताना देखील दिसते. सानिया परत निकाह करणारा का हा प्रश्न तिला सातत्याने विचारला जातोय.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का