Love Life : हैदराबादच्या महाराजांच्या नातीशी संजूबाबाचं दुसरं लग्न, तुरुंगात कशी सुरु झाली Love Story
Love Life : अभिनेता संजय दत्त आता तिसऱ्या बायकोसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण पहिल्या बायकोच्या निधनानंतर अभिनेत्याने हैदराबादच्या महाराजांच्या नातीशी संसार थाटला, पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

Love Life : अभिनेता संजय दत्त एकेकाळी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आज संजूबाबा तिसरी बायको आणि दोन जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण अनेक महिलांसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. संजय याच्या पहिल्या पत्नीचं फार लवकर निधन झालं. पण दुसऱ्या पत्नीसोबत अभिनेत्याचा संसार फार काळ टिकला नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सांगायचं झालं तर, संजूबाबा याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रिया पिल्लई असं आहे. जेव्हा संजूबाबा तुरुंगात होता, तेव्हा रिया पिल्लई अभिनेत्याच्या आयुष्यात आली. कठीण काळात साथ दिल्यामुळं संजूबाबाने रिया पिल्लई हिच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही.
सांगायचं झालं तर, संजय याच्या खासगी आयुष्यात अनेक संकटं आली. त्याकाळात अनेकांनी अभिनेत्याची साथ सोडली. पण रिया हिने कधीच अभिनेत्याला एकटं सोडलं नाही. रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. कठीण काळात साथ दिल्यामुळे संजय याच्या मनात रिया हिच्याबद्दल प्रेम आणि सन्मान अधिक वाढला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं.
रिपोर्टनुसार, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, संजय याने कुटुंबाला अधिक वेळ न देता, सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाला. त्याने सलग सात सिनेमे साईन केले आणि याच कारणामुळे तो रिया हिला वेळ देऊ शकत नव्हता. पण अनेक जण असं देखील सांगतात की, सत्य हे नाही. खरं तर, संजूबाबा याच्या आयुष्यात मान्यता, तर रिया हिच्या आयुष्यात टेनिस प्लेयर लिएंडर पेस याची एन्ट्री झालेली. याच कारणामुळे दोघांमध्ये सतत वाद होण्यास देखील सुरुवात झाली.
अशात दोघांनी विभक्त होण्याचा निर्यण घेतला. संजूबाबा आणि रिया हिचं २००५ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर रिया पिल्लई हिने प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील अधिक काळ टिकू शकलं नाही. त्यांना एक मुलगी देखील आहे.
आता श्रीमंत घराण्याची लेक आणि संजूबाबाची दुसरी पत्नी काय करते याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिया पिल्लई हिला संजूबाबाने घटस्फोटानंतर, दोन फ्लॅट दिले. एवढंच नाही तर, दोन कंपन्याचे शेअर्स देखील तिच्या नावावर केले. शिवाय तिच्या सर्व खर्चाची जबाबदारी देखील संजूबाबाने स्वतःच्या खांद्यावर घेतली.