करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरची एकूण संपत्ती किती? मुलांसाठी दर महिन्याला किती पैसे द्यायचा

घटस्फोटानंतर संजयने करिश्माला पोटगी म्हणून मोठी रक्कम दिली होती. त्यांचा घटस्फोट हा त्या काळातील सर्वात महागडा घटस्फोट म्हणून ओळखला जात होता.

करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरची एकूण संपत्ती किती? मुलांसाठी दर महिन्याला किती पैसे द्यायचा
Karishma Kapoor Husband
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 13, 2025 | 8:28 AM

अहमदाबादमधील विमान अपघाताच्या दु:खद घटनेनंतर काही तासांनीच बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूरचे इंग्लंडमध्ये निधन झाले. पोलो खेळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. संजय आणि करिश्मा यांचा विवाह २००३ मध्ये झाला होता. या जोडप्याला दोन मुले आहेत, मुलगी समैरा आणि मुलगा कियान. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनीच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. २०१४ मध्ये दोघेही घटस्फोटासाठी कोर्टात गेले. त्यांचा घटस्फोट वादग्रस्त ठरला होता. त्यावर २०१६ मध्ये कोर्टाने शिक्कामोर्तब केले. घटस्फोटानंतर संजने करिश्माला मुलांचा सांभाळ करण्यासाठी दरमहिन्याला पैसे दिले. तसेच पोटगी म्हणून देखील मोठी रक्कम दिली

घटस्फोटानंतर करिश्मा आणि संजय वर्षानुवर्षे एकमेकांना भेटले नाहीत. पण २०२३ मध्ये ते दोघे एका डिनर आउटिंगवर दिसल्याने पुन्हा चर्चेत आले. करिश्मा कपूरपासून घटस्फोटानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवशी विवाह केला. पण करिश्माने दुसरे लग्न केले नाही. घटस्फोटानंतर दोघे कधीच भेट झाली नाही. मात्र, २०२३ मध्ये त्या फोटोंनी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, ज्यामध्ये घटस्फोटानंतर सात वर्षांनी दोघे हसत-खेळत एकत्र दिसले.

वाचा: हनीमूनला गेल्यावर पतीने केली ‘गंदी बात’, केवळ 12 दिवसातच मोडं अभिनेत्रीचं लग्न

रेस्टॉरंटबाहेर करिश्मा-संजय यांना पाहिले गेले

खरे तर, २०२३ मध्ये संजय कपूर पूर्व पत्नी करिश्मासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसला. रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. करिश्मा प्रिंटेड आउटफिटमध्ये दिसली, तर संजयने पांढरा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती. करिश्माने फोटोग्राफर्सला पाहून स्मितहास्य केले आणि त्यांना ‘थँक यू’ म्हणत दोघेही आपापल्या गाड्यांमधून निघून गेले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही.

करिश्मा कपूर-संजय कपूर यांचा वादग्रस्त घटस्फोट

करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट तेव्हा एक गाजलेले प्रकरण बनला. कारण दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. संजय आणि करिश्माने सार्वजनिकपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. करिश्माचे वडील, रणधीर कपूर यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मुलीच्या घटस्फोटाबद्दल बोलताना संजयला ‘थर्ड-क्लास’ माणूस म्हटले होते.

घटस्फोटानंतर करिश्माला मिळालेली पोटगी…

घटस्फोटानंतर संजय कपूरने करिश्मा आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते. याशिवाय करिश्मा कपूरला संजयच्या वडिलांचे घरही देण्यात आलं. एवढंच नाही तर, आजपर्यंत संजय कपूर प्रत्येक महिन्याला करिश्माला 10 लाख रुपये देत होता. संजय मुलांच्या शिक्षणाचा देखील खर्च देत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूर सोना BLW प्रेसिजनचा चेअरमन आहे. संजय कपूर याच्याकडे जवळपास 120 कोटींची संपत्ती आहे.

इकडे करिश्मापासून घटस्फोट, तिकडे पुन्हा लग्न

संजय आणि करिश्मा यांचा घटस्फोट २०१६ मध्ये झाला. घटस्फोटानंतर लगेचच २०१७ मध्ये त्यांनी प्रिया सचदेवशी विवाह केला. प्रियाचे हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी अजारियस कपूर ठेवले. तर, प्रियाच्या पहिल्या लग्नापासून त्यांना एक मुलगीही आहे.