हनीमूनला गेल्यावर पतीने केली ‘गंदी बात’, केवळ 12 दिवसातच मोडलं अभिनेत्रीचं लग्न
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने 3 वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंडशी लग्न केले. पण लग्नाच्या अवघ्या 12 दिवसात तिचा संसार मोडला. आता ही अभिनेत्री कोण जाणून घ्या....

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लव्ह, अफेअर, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट या गोष्टींमुळे कायमच चर्चेत राहतात. बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जिचे लग्न केवळ 12 दिवसात मोडले. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पूनम पांडे आहे. पूनम ही कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी किंवा खासगी आयुष्यासाठी चर्चेत राहिली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना, विशेषतः तिचे लग्न आणि घटस्फोटाच्या प्रकरणाने खूप वाद झाला होता.
2020 मध्ये पूनमने तिचा दीर्घकालीन प्रियकर सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काहीच काळात त्यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटामागील कारणे आणि पूनमने तिच्या पतीवर केलेले गंभीर आरोप यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. याशिवाय, 2022 मध्ये कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊन तिने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक खुलासे केले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली. चला, या प्रकरणाविषयी सविस्तर जाणून घेऊ.
पूनमने उघड केले वैवाहिक जीवनातील रहस्ये
‘लॉकअप’ शोमध्ये पूनमने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. तिने सांगितले की, तिचा पती सॅम बॉम्बे तिच्यावर सतत संशय घ्यायचा. इतकेच नव्हे, तर ती तिच्या पाळीव कुत्र्यावर प्रेम करत असतानाही सॅम तिला मारहाण करायचा. पूनमला तिचा फोन वापरण्याची परवानगीही नव्हती, इतक्या कडक निर्बंधांखाली तिला ठेवले जायचे.
कौटुंबिक हिंसेचे गंभीर आरोप
पूनमने सॅमवर कौटुंबिक हिंसेचे गंभीर आरोप केले होते. तिने सांगितले की, सॅम ज्या खोलीत राहायचा, तिलाही तिथेच राहावे लागायचे आणि तो तिला शारीरिक तसेच मानसिकरित्या खूप त्रास द्यायचा. अहवालांनुसार, पूनमने सॅमवर अनैसर्गिक पद्धतीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला होता. विशेष म्हणजे, हनीमूनदरम्यानच पूनमने सॅमवर कौटुंबिक हिंसेचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यामुळे सॅमला तुरुंगवासही भोगावा लागला.
१२ दिवसांत तुटले लग्न
या प्रकरणामुळे त्यावेळी खूप वाद निर्माण झाले होते. विशेष बाब म्हणजे, पूनम आणि सॅम लग्नापूर्वी तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या १२ दिवसांतच त्यांचा संसार मोडला. सध्या पूनम अविवाहित आहे आणि ती तिचे आयुष्य स्वातंत्र्यपणे जगत आहे.
सोशल मीडियावर सक्रिय
पूनम पांडे ही चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली, तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ३.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती तिच्या बोल्ड फोटों आणि व्हिडिओंमुळे सतत चर्चेत असते. तिच्या चाहत्यांमध्ये ती आजही खूप लोकप्रिय आहे. ती तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात नव्या संधींचा शोध घेत आहे.
