
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या व्यवसायाच्या आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या वारसाबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि, काही दिवसांनी संजय कपूरच्या कंपनीला नवीन अध्यक्षही मिळाला. पण तुम्हाला माहिती आहे का संजय कपूरच्या मालमत्तेत सर्वात मोठा हिस्सा कोणाला मिळणार आहे ते?
तीन मुलांपेक्षा सगळ्यात मोठा हिस्सा कोणाला मिळणार?
संजय कपूरने आयुष्यात तीन लग्ने केली. त्यांनी पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी केले. त्यानंतर त्यांनी करिश्मा कपूरशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी समायरा आणि मुलगा कियान आहे. अभिनेत्रीशी घटस्फोट घेतल्यानंतर संजयने तिसरे लग्न प्रिया सचदेवशी केले. या दोघांना एक मुलगा आहे. परंतु संजयच्या सावत्र मुलीला संजयच्या मालमत्तेत त्यांच्या तीन मुलांपेक्षा सगळ्यात मोठा हिस्सा मिळणार असल्याचं म्हटलं जातं आहे.
संजयच्या मालमत्तेत सावत्र मुलीचा वाटा सर्वात जास्त आहे
संजय कपूरची एकूण संपत्ती 10,300 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. संजय 31 हजार कोटींच्या कंपनी सोना कॉमस्टारचे मालक होते. संजयच्या मृत्यूनंतर त्याची तिसरी पत्नी प्रिया हिला या कंपनीची नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आलं आहे. त्याच वेळी, संजयच्या संपत्तीत कोणाला किती हिस्सा मिळेल याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु वन इंडियाच्या एका अहवालात म्हटले आहे की संजय कपूरच्या संपत्तीत सफिरा चटवालला सर्वात जास्त वाटा मिळेल.
कोण आहे सफिरा चटवाल?
सफिरा ही संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव आणि तिचा एक्स पती विक्रम चटवाल यांची मुलगी आहे. पालकांच्या घटस्फोटानंतर सफिरा तिच्या आईसोबत राहत होती. वृत्तानुसार, प्रियाशी लग्न केल्यानंतर संजय कपूरने सफिराची देखील जबाबदारी स्वतःवर घेतली होती. भारतीय कायद्यानुसार, संजयच्या संपूर्ण संपत्तीवर सफिराचा तितकाच अधिकार आहे जितका त्याच्या स्वतःच्या मुलांचा आहे. त्यामुळे एका वृत्तानुसार सफिराला मालमत्तेचा सर्वात जास्त हिस्सा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.