AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटलं, मी रडलो…’, संकर्षण कऱ्हाडे याचा मोठा खुलासा

आयुष्यात आलेल्या चढ-उतारांचा संकर्षण कऱ्हाडे याने केला मोठा खुलासा... निराश झालेल्या अभिनेत्याच्या आयुष्यात अलेली 'ती' व्यक्ती म्हणजे... सर्वत्र संपर्षण याची चर्चा...

'त्या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटलं, मी रडलो...', संकर्षण कऱ्हाडे याचा मोठा खुलासा
| Updated on: Jun 14, 2023 | 1:54 PM
Share

मुंबई | अभिनय क्षेत्रात काम मिळवण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. शिवाय मिळालेली प्रसिद्धी आणि लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने देखील इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अनेक चढ-उतारांचा सामना केला. पण आज संकर्षण कऱ्हाडे हा सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. पण अभिनय क्षेत्रातील प्रवास अभिनेत्यासाठी फार कठीण होता. अनेकदा नकाराचा सामना केलेल्या संकर्षण कऱ्हाडे स्वतःची ओळख निर्माण करतना अनेकदा रडला देखील अभिनेत्याने आयुष्यात आलेल्या चढ-उतारांचा मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा सुरु आहे…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे म्हणाला, ‘२००८ मध्ये ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ कार्यक्रमामुळे मला लोकप्रियता मिळाली.. झी मराठीवर प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमामुळे माझ्या थोड्याफार ओळखी झाल्या… पण तरी देखील मला मालिकांमधून काढून टाकण्यात आलं.. मालिकांसाठी लूक टेस्ट झाल्यानंतर मला काढण्यात आलं आहे…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘स्टाप प्रवाह वरील ‘स्वप्नांच्या पलिकडले’ मालिकेत अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि गौरी नलावडे मुख्य भूमिकेत होते. मालिकेसाठी मी तीन दिवस चित्रीकरण केलं… त्यानतंर तुमचं काम ठिक होत नाही.. असं फोन वरुन सांगत चौथ्या दिवशी मला येवू नकोस असं सांगण्यात आलं… तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं मी रडलो देखील…’

‘एमबीए करत असताना मला मालिकेतून काढण्यात आलं… दोन महिन्यांची तालिम आणि दहा प्रयोग झाल्यानंतर मला ‘मी रेवती देशपांडे’ नाटकातून मला काढण्यात आलं.. सतत येत असलेल्या नकारामुळे मला प्रचंड वाईट वाटत होतं. मी रडलो देखील. पण कठीणवेळी तुमच्यासोबत कोण आहे, हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं’ असं देखील संकर्षण म्हणाला…

कठीण काळात कोण अधिक महत्त्वाचं असतं याचा खुलाचा देखील अभिनेत्याने केला. ‘ ‘स्वप्नांच्या पलिकडले’ मालिकेतून बाहेर काढल्यानंतर मी स्टुडिओच्या बाहेर पडलो. तेव्हा एक व्यक्तीने मला हाक मारली आणि विचारलं काय झालं? मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.. तेव्हा ते मला म्हणाले, ‘एक दिवस असा येईल जेव्हा तू कामात पूर्णपणे व्यस्त असशील आणि ज्यांनी आता तुला नकार दिला आहे, तेच तुला कामासाठी फोन करून विचारतील..’ संकर्षण कऱ्हाडे आयुष्यातील ती महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अशोक शिंदे…

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.