अमृता-संजूची अनोखी कहाणी, ‘सप्तपदी मी रोज चालते’ नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला!

| Updated on: Mar 24, 2021 | 9:31 AM

'सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेत अमृता आणि संजू यांची कहाणी पहायला मिळणार आहे. या दोघांच्या माध्यमातून पवार आणि थोरात या दोन कुटुंबाची कथाही यात दिसणार आहे.

अमृता-संजूची अनोखी कहाणी, ‘सप्तपदी मी रोज चालते’ नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला!
सप्तपदी मालिका
Follow us on

मुंबई : आजवर विविध आशयघन चित्रपट– कार्यक्रमांद्वारे रसिकांचं मनोरंजन करणारी ‘फक्त मराठी वाहिनी’ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या दिशेनं मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या ‘साईबाबा श्रद्धा आणि सबूरी’ या अनोख्या आध्यात्मिक मालिकेला काही दिवसांतच प्रेक्षकांनी आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. ‘फक्त मराठी वाहिनी’ने नवनव्या कथा कल्पना असलेल्या कलाकृतींच्या निर्मितीचा ध्यास घेतला असून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीनुसार विविध कार्यक्रमांच्या निर्मितीला सुरुवात करीत ‘सप्तपदी मी रोज चालते’ (saptapadi me roj chalet) असं शीर्षक असलेली दुसरी दैनंदिन नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात विशेष लौकिक असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी या ‘फक्त मराठी वाहिनी’च्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यभार पाहत आहेत (saptapadi me roj chalet new serial on fakt Marathi channel).

‘साईबाबा श्रद्धा आणि सबूरी’ या आध्यात्मिक मालिकेनंतर ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याबाबत ‘फक्त मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले की, ‘फक्त मराठी वाहिनी’ने आजवर नेहमीच निखळ मनोरंजन देण्याचं काम केलं आहे. हिच परंपरा जोपासत आम्ही दैनंदिन मालिकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्याची योजना आखली आहे. ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही पुढील मालिका प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नावीन्यपूर्ण देण्यात यशस्वी होईल.

दैनंदिन मालिका तसेच विविध लोकप्रिय चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे या आमच्या या मालिकेच्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत असल्याने मालिकेला त्यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल. मागील पाच वर्षांच्या काळामध्ये ‘फक्त मराठी वाहिनी’ने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला असून विविध कथा विषय असलेल्या दैनंदिन मालिकांच्या निर्मितीद्वारे वाहिनीचा विस्तार होणार असल्याचा विश्वासही श्याम मळेकर यांनी व्यक्त केला आहे (saptapadi me roj chalet new serial on fakt Marathi channel).

काय आहे कथानक?

‘सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेत अमृता आणि संजू यांची कहाणी पहायला मिळणार आहे. या दोघांच्या माध्यमातून पवार आणि थोरात या दोन कुटुंबाची कथाही यात आहे. अमृताला आपल्या आईप्रमाणे कर्तबगार आणि वडीलांप्रमाणे समजूतदार पती हवा आहे. कालांतराने तिच्या आयुष्यात संजूची एंट्री होते, पण त्याला काहीही न करता फक्त ऐशोआरामात जीवन जगायचं आहे. अशी ही जोडी भविष्यात ‘सप्तपदी’ कशी चालणार या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागागणिक मिळणार आहे. या मालिकेतील प्रत्येक करॅक्टर वास्तविक जीवनातील खरे खुरे रंग दाखवणारं असल्यानं प्रत्येकाला ही मालिका आपल्याच घरातील कथा सांगणारी असल्यासारखं वाटेल. आज इतर वाहिन्यांवर सुरू असलेल्या कौटुंबिक मालिकांच्या तुलनेत ‘सप्तपदी’मध्ये काहीसं वेगळं कथानक पहायला मिळणार असून, त्यातही अनेक कंगोरे असल्यानं मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी पुरेसे ठरणारे आहेत.

या मालिकेत तृप्ती देवरे, बिपीन सुर्वे, विजय मिश्रा, स्नेहा रायकर, अखिल लाले, संजना काळे, प्राप्ती बने, वंदना वाकनीस, विपुल साळुंखे, आरती शिंदे, अमित कल्याणकर, रुपाली गायके, रणजित रणदिवे, चेतन चावडा, श्रुती पारकर, हर्षदा कर्वे, पूजा यादव आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

(saptapadi me roj chalet new serial on fakt Marathi channel)

हेही वाचा :

Video | ‘झुठे नैना बोले…’ इंडियन आयडॉलच्या मंचावर अंजलीच्या शास्त्रीय गाण्याने बहार! पाहा व्हिडीओ…