AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘झुठे नैना बोले…’ इंडियन आयडॉलच्या मंचावर अंजलीच्या शास्त्रीय गाण्याने बहार! पाहा व्हिडीओ…

अंजलीच्या ‘झुठे नैना बोले...’ या गाण्यातील तिच्या सुरांच्या हरकती ऐकून मंचावर उपस्थित सर्वानीच तिचे कौतुक केले. या विशेष भागात प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि सध्याची आघाडीची अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली होती. दोघींनीही अंजलीचे खूप कौतुक केले.

Video | ‘झुठे नैना बोले...’ इंडियन आयडॉलच्या मंचावर अंजलीच्या शास्त्रीय गाण्याने बहार! पाहा व्हिडीओ...
अंजली गायकवाड
| Updated on: Mar 23, 2021 | 4:02 PM
Share

मुंबई : सध्या प्रसिद्ध कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल’चा 12 सीझन (Indian Idol 12) सुरु आहे. या पर्वाने रसिक श्रोत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. या एकापेक्षा एक सरस स्पर्धकांमध्ये अहमदनगरची गायिक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. मुळची अहमदनगरची असणाऱ्या अंजलीने या आधीही अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनाची चुणूक दाखवली आहे. नुकतचं तिने या मंचावर ‘झुठे नैना बोले…’ हे शास्त्रीय संगीताचा बाज असलेले गाणे सदर केले (Anjali Gaikwad classical performance on indian idol 12 stage).

अंजलीच्या ‘झुठे नैना बोले…’ या गाण्यातील तिच्या सुरांच्या हरकती ऐकून मंचावर उपस्थित सर्वानीच तिचे कौतुक केले. या विशेष भागात प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि सध्याची आघाडीची अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली होती. दोघींनीही अंजलीचे खूप कौतुक केले.

पाहा अंजलीचा ‘हा’ धमाकेदार पर्फोर्मंस

सारेगमपची विजेती अंजली

‘सारेगमप’च्या लिटील चॅम्प या शोमध्ये अंजलीची बहीण नंदीनीनेही सहभाग घेतला होता. पण दुर्दैवाने ती शोच्या फिनालेपर्यंत पोहोचू शकली नव्हती. लिटील चॅम्पस शो सुरु झाला तेव्हापासून अंजली ही ‘टॉप 5’मध्ये होती. नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि जावेद अली व्यतिरीक्त 30 सदस्यीय ज्युरींनी हा शो जज केला होता. याआधीही अंजलीने तिच्या बहिणीच्या साथीने ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमात बाजी मारली होती.

वडिलच अंजलीचे गुरु

आपल्या संगीत प्रवासाविषयी सांगताना अंजली म्हणते, ‘माझ्या घरातच सुरुवातीपासून संगीतमय वातावरण होते. माझे वडीलच माझे गुरु आहेत. ते घरीच मुलांना गायनाचे धडे देतात. मी तीन वर्षांचे होते, तेव्हापासून संगीत ऐकत आणि समजून घेत होते. माझ्या वडिलांनी माझ्यातील कला ओळखली आणि त्यांनी स्वतःच मला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. माझी बहिण नंदिनी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. खरं सांगायचं तर मी माझ्या ताईला बघूनच या क्षेत्रात आले (Anjali Gaikwad classical performance on indian idol 12 stage).

6 स्पर्धकांना मागे टाकत अंजलीने पटकावलेला मानाचा किताब

जयपूर येथील एका स्टुडिओमध्ये ‘सारेगामापा’चा ग्रँड फिनाले पार पडला होता. या मध्ये अंजलीने 6 स्पर्धकांना मागे टाकत हा मानाचा किताब आपल्या नावे केला होता. या शोमध्ये एक नाही तर दोन स्पर्धकांना विजेता घोषित करण्‍यात आले होते. सारेगमपच्या शोच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले होते. अंजलीसोबतच श्रेयण भट्टाचार्य हाही लिटील चॅम्पसचा विजेता ठरला होता. फिनालेमध्ये श्रेयणने ‘हवाएं’, ‘सूरज डूबा’ आणि ‘जालिमा’ यासारखी गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले होते, तर अंजलीने ‘दीवानी मस्‍तानी’, ‘झल्‍ला वल्‍ला’ ‘मैं कोल्‍हापुर से आई हूं’ ही शानदार गाणी गायली होती.

(Anjali Gaikwad classical performance on indian idol 12 stage)

हेही वाचा :

Malaika Arora | मलायकाने चोरी केली चक्क रस्त्यावरची फुले, चाहत्यांनी विचारताच म्हणाली…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.