AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora | मलायकाने चोरी केली चक्क रस्त्यावरची फुले, चाहत्यांनी विचारताच म्हणाली…

सध्या वसंत ऋतूचा हंगाम सुरु झाला आहे आणि सर्वत्र फुलेच फुले फुलली आहेत. रंगीबेरंगी फुलांचा सडा सर्वत्र विखुरलेला आहे. अशा परिस्थितीत फुलांचा मोह अभिनेत्रींनाही कसा टाळता येईल?

Malaika Arora | मलायकाने चोरी केली चक्क रस्त्यावरची फुले, चाहत्यांनी विचारताच म्हणाली...
मलायका अरोरा
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 23, 2021 | 2:48 PM
Share

मुंबई : सध्या वसंत ऋतूचा हंगाम सुरु झाला आहे आणि सर्वत्र फुलेच फुले फुलली आहेत. रंगीबेरंगी फुलांचा सडा सर्वत्र विखुरलेला आहे. अशा परिस्थितीत फुलांचा मोह अभिनेत्रींनाही कसा टाळता येईल? अभिनेत्री मलायका अरोराच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. मलायका अरोराने (Malaika Arora) रस्त्यावर बोगनवेलियाची फुले पाहिली आणि ती फुले तोडण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन असणाऱ्या मलायकाने त्वरीत कात्रीने ही सुंदर फुले कापली. हा फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केला. विशेष म्हणजे आता मलायका अरोराचा हा फोटोही खूप चर्चेत आला आहे. चाहतेही या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत (Malaika Arora stole roadside flowers and share photo on social media).

मलायका अरोरा फोटोने तिच्या इंस्टाग्रामवर फुलांसह एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, ‘फूल चोर… वसंत ऋतू आला आहे …’ अशा प्रकारे तिने गमतीत स्वतःचीच चेष्ठा केली आहे आणि ती स्वतःला चक्क फुल चोर म्हणाली आहे. मलायका अरोराचा हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे आणि याबद्दल अनेक कमेंट्स येत आहेत. या फोटोमध्ये तिच्या हातात बोगेनवेलियाची फुले तसेच, दुसऱ्या हातात कात्री दिसते आहे. चाहते या फोटोला ‘अमेझिंग’ म्हणत तिचे कौतुक करत आहेत.

पाहा मलायकाची पोस्ट

 (Malaika Arora stole roadside flowers and share photo on social media

सोशल मीडियावर सक्रिय मलायका…

सध्या मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकत्याच एका पोस्टमध्ये तिने योगाबद्दल माहिती दिली, जी तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. त्यानंतर इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यातील बर्‍याच गोष्टींची झलकदेखील पाहायला मिळते.

… म्हणून झाला अरबाज-मलायकाचा घटस्फोट!

सध्या मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचे नाते खूप चर्चेत आहे. या नात्यामुळे अनेकदा मलायकावर टीका केली जाते. मात्र, यावर तिने थेट उत्तर दिले आहे. अनेकांनी या घटस्फोटाला मलायकाला जबाबदार धरलं. अनेक वेळा मलायकाला याबद्दलचे टोमणेही ऐकायला मिळाले. पण एका मुलाखतीत बोलताना आपला घटस्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण सांगताना मलायका म्हणाली, अरबाजला जुगाराचा नाद लागला होता तो काही केल्या सुटत नव्हता. मलायकाने खूप प्रयत्न केले पण काही फायदा होत नव्हता. अखेर तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांच्यात दररोज भांडणं होत. मग दररोज भांडणापेक्षा घटस्फोट घेतलेला बरा म्हणून मलायकाने अखेर निर्णय घेतला आणि ती वेगळी झाली. परंतु दरम्यानच्या काळात तिला खूप मानसिक त्रास देखील झाला.

(Malaika Arora stole roadside flowers and share photo on social media)

हेहि वाचा  :

PHOTO | सनी लिओनीच्या ‘प्रिन्सेस’ लूकवर चाहते झाले फिदा! पाहा तिचे फोटो…

PHOTO | दुसऱ्यांदा आई बनल्यानंतर ‘बेबो’ पुन्हा शूटला हजर, फिट लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!

Follow Us
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...