AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan – Shubman Gill यांचं ब्रेकअप? एकमेकांना केलं अनफॉलो, नक्की काय आहे प्रकरण?

सारा अली खान - शुभमन गिल यांच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो.. अफेअरच्या चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र सारा - शुभमन यांच्या नात्याची चर्चा..

Sara Ali Khan - Shubman Gill यांचं ब्रेकअप? एकमेकांना केलं अनफॉलो, नक्की काय आहे प्रकरण?
| Updated on: May 27, 2023 | 11:27 AM
Share

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या रिलेशनशिपची चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे.. शुभमन गिल नक्की कोणाला डेट करत आहे.. अशा देखील चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण आता सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. सारा अली खान आणि शुभमन गिल यांचं ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात येत आहे.. ही गोष्ट समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा तुफान रंगल्या हेत्या. आता दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खान आणि शुभमन गिल यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. सोशल मीडिया कमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या नात्याचा अंदाज वर्तवण्यात येतो.. पण आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे.. ज्यामुळे सारा अली खान आणि शुभमन गिल यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी यावर मौन बाळगलं आहे..

शुभमन गिल याचं नाव फक्त सारा अली खान हिच्यासोबत नाही तर, सारा तेंडुलकर हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं.. पण आता सारा अली खान सोबत असलेल्या नात्यामुळे चाहत्यांना देखील मोठा प्रश्न पडला आहे. सध्या शुभमन गिल त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे.. पण शुभमन कोणाला डेट करत आहे? याबद्दल क्रिकेटरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही..

एका मुलाखतीमध्ये शुभमन याला आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शुभमन याने सारा अली खान हिचं नाव घेतलं. एवढंच नाही तर साराला डेट करत आहेस का? असा प्रश्न देखील क्रिकेटरला विचारण्यात आला. या प्रश्नावर शुभमन म्हणाला, ‘शायद हा शायद ना…’ या उत्तरानंतर शुभमन तुफान चर्चेत आला.

दरम्यान सारा खान आणि शुभमन गिल यांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांना एकत्र फिरताना स्पॉट करण्यात आलं. शिवाय दिल्ली येथील एका हॉटेलच्या बाहेर पडताना दोघांना एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. पण आता सारा आणि शुभमन गिल यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत आहेत.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?