
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाल करताना दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. जरा हटके जरा बचके चित्रपटात सारा अली खान हिच्यासोबत विकी काैशल हा मुख्य भूमिकेत होता. सारा आणि विकीची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. या चित्रपटाने (Movie) खरोखर धमाल केली आहे.
सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ सारा शेअर करते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही लग्झरी गाड्या सोडून चक्क मुंबईत रिक्षाने प्रवास करताना दिसली होती. सारा अली खान हिचे मुंबईत रिक्षाने प्रवास करतानाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
नुकताच सारा अली खान ही चित्रपटाच्या यशानंतर गोव्यामध्ये सुट्टया घालवण्यासाठी गेली आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिने शेअर केलेले फोटो पाहून अनेक चर्चांना उधाण आले आहे. एका खास व्यक्तीसोबत सारा अली खान ही गोव्यामध्ये गेलीये. यामुळे आता सारा अली खान हिच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगताना दिसत आहेत.
केदारनाथ चित्रपटाच्या असिस्टेंट डायरेक्टरसोबत गोव्यामध्ये चिल करताना सारा अली खान ही दिसत आहे. जेहान हांडा याच्यासोबत सारा गोव्यामध्ये आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिने काही खास फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जेहान हांडा याच्यासोबत खास पोज देताना देखील सारा अली खान ही दिसत आहे.
सारा अली खान हिने फोटो शेअर केल्यापासून तिच्या आणि जेहान हांडा यांच्या अफेअरच्या चर्चा या सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेट करत असल्याचे सांगितले जात होते. विशेष म्हणजे यांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र, यांच्या अफेअरची बातमी आल्याने चाहते निराश झाले. आता सारा ही जेहान हांडा याला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.