मुस्लीम अभिनेत्री बनली रामायणातील ‘लक्ष्मणा’ची सून; तिचं दुसरं लग्न तर सासरेही घटस्फोटीत

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांच्या मुलाने नुकतंच मुस्लीम अभिनेत्रीशी लग्न केलं. या अभिनेत्रीचं हे दुसरं लग्न आहे. तर सुनील लहरी यांच्या मुलापेक्षा ती वयाने चार वर्षांनी मोठी आहे.

मुस्लीम अभिनेत्री बनली रामायणातील लक्ष्मणाची सून; तिचं दुसरं लग्न तर सासरेही घटस्फोटीत
Sunil Lahri and Sara Khan- krish pathak
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2025 | 9:10 AM

‘बिदाई’, ‘बिग बॉस’ यांसारख्या मालिका आणि शोजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खानने नुकतंच दुसरं लग्न केलं. 6 ऑक्टोबर रोजी तिने कोर्ट मॅरेज केलं आणि त्याचे फोटो तिने 8 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केले. साराच्या पतीचं नाव क्रिश पाठक असून तो अभिनेता आणि निर्माता आहे. या दोघांची भेट एका डेटिंग अॅपद्वारे झाली होती. गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. इन्स्टाग्रामवर साराने मॅरेज सर्टिफिकेटचाही फोटो पोस्ट केला आहे. ‘अखेर आम्ही एकत्र आलो. दोन वेगवेगळ्या आस्था आहेत, परंतु स्क्रिप्ट एकच आहे आणि खूप सारं प्रेम आहे. कुबूल है पासून सात फेऱ्यांपर्यंत. येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही विधीवत लग्न करू. दोन हृदय, दोन संस्कृती.. आता कायमसाठी एक झाले’, अशा शब्दांत साराने भावना व्यक्त केल्या आहेत.

येत्या 5 डिसेंबर रोजी क्रिश आणि सारा धूमधडाक्यात लग्न करणार आहेत. क्रिशसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल साराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, “मी जेव्हा एका डेटिंग अॅपवर क्रिशचा फोटो पाहिला, तेव्हा लगेच मला एक खास कनेक्शन जाणवलं. त्यानंतर आम्ही चॅटिंगला सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी आम्ही भेटलो. आम्ही डिसेंबर महिन्यात हिंदू आणि मुस्लीम विवाहपद्धतीनुसार लग्न करणार आहोत. कारण या लग्नाच्या निमित्ताने दोन वेगळ्या संस्कृती एकत्र आल्या आहेत. माझी सासू नैनीतालची आहे, त्यामुळे त्याठिकाणी आमचं लग्न होईल.”

क्रिशने ‘पीओडब्ल्यू: बंदी युद्ध के’ आणि ‘ये झुकी झुकी सी नजर’ यांसारख्या शोजमध्ये काम केलंय. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांचा तो मुलगा आहे. सुनील लहरी यांनी दोनदा लग्न केलंय. त्यांचं पहिलं लग्न राधा सेनशी झालं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नव्हता. त्यानंतर त्यांनी भारती पाठक यांच्याशी दुसरं लग्न केलं. क्रिश हा सुनील आणि भारती यांचाच मुलगा आहे. परंतु क्रिश नऊ महिन्यांचा असतानाच सुनील लहरी यांचा दुसरा घटस्फोट झाला. त्यामुळे क्रिशला आई भारती यांनीच लहानाचं मोठं केलं.

दुसरीकडे सारा खानसुद्धा घटस्फोटीत आहे. 2010 मध्ये तिने अभिनेता अली मर्चंटशी ‘बिग बॉस’च्या घरात लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला होता. अलीने कायदेशीर पद्धतीने लग्न केलं नसल्याचा आरोप साराने केला होता. त्याचसोबत तिने फसवणुकीची तक्रार केली होती.