Vaibhavi Upadhyaya | ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू; अवघ्या 32 व्या वर्षी गमावला जीव

मालिकांसोबतच वैभवीने चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या. 'तिमिर' या चित्रपटातही तिने काम केलं आहे.

Vaibhavi Upadhyaya | 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू; अवघ्या 32 व्या वर्षी गमावला जीव
Vaibhavi UpadhyayaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 7:55 AM

मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेत जास्मिनची भूमिका साकारलेली अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं निधन झालं. अवघ्या 32 व्या वर्षी तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. फिरायची प्रचंड आवड असलेली वैभवी तिच्या पतीसोबत उत्तर भारतात फिरायला गेली होती. तिथेच तिचा कार अपघातात मृत्यू झाला. निर्मादे जे. डी. मजेठिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. वैभवीच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुंबईत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

23 मे (मंगळवार) रोजी दुपारी हिमाचल प्रदेशमध्ये वैभवीच्या कारचा अपघात झाला. रस्त्याच्या एका तीव्र वळणावर गाडीचा ताबा सुटला आणि अपघात झाला. निर्माते जे. डी. मजेठिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. ‘आयुष्य खूपच अनपेक्षित आहे. एक दमदार अभिनेत्री आणि माझी खास मैत्रीण वैभवी उपाध्याय जी ‘जास्मिन’ या नावाने अधिक ओळखली जायची, तिचं निधन झालं. उत्तर भारतातील एका अपघातात तिचा मृत्यू झाला. वैभवीच्या पार्थिवाला बुधवारी मुंबईत आणलं जाणार आहे. मुंबईत सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील. तिच्या आत्म्याला शांती मिळो’, अशा शब्दांत त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत वैभवीसोबत काम केलेली अभिनेत्री रुपाली गांगुलीनेही इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे. ‘तू खूपच लवकर आम्हाला सोडून गेलीस’, अशा शब्दांत ‘अनुपमा’ फेम रुपालीने शोक व्यक्त केला आहे. त्यानंतर तिने वैभवीसोबतचा एक रिलसुद्धा शेअर केला. ‘अजूनही विश्वास बसत नाही’, असं कॅप्शन लिहित तिने वैभवीच्या आठवणींना उजाळा दिला.

मालिकांसोबतच वैभवीने चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या. ‘तिमिर’ या चित्रपटातही तिने काम केलं आहे. याशिवाय सीआयडी, अदालत असा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

एकाच आठवड्यात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील दोन कलाकारांचं निधन झाल्याने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 22 मे रोजी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. त्यानंतर आता वैभवीच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.