AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

120 कोटी बजेट, पण चित्रपट ठरला फ्लॉप, झालं 96 कोटींचं नुकसान, OTT वर येताच ठरला नंबर 1

120 कोटी बजेट पण चित्रपट थिएटरमध्ये ठरला फ्लॉप. झालं 96 कोटी रुपयांचं नुकसान. पण हाच चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताच पाहण्यासाठी उडाली झुंबड. ठरला नंबर 1.

120 कोटी बजेट, पण चित्रपट ठरला फ्लॉप, झालं 96 कोटींचं नुकसान, OTT वर येताच ठरला नंबर 1
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 05, 2026 | 1:32 PM
Share

दाक्षिणात्य सुपरस्टार कार्तिच्या ‘सरदार 2’ या तमिळ चित्रपटाने थिएटरनंतर OTTवर दमदार कमबॅक केला आहे. सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरलेला हा चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी OTTवर आलेल्या ‘सरदार 2’ने अवघ्या काही दिवसांत Amazon Prime Video च्या टॉप 10 ट्रेंडिंग सिनेमांच्या यादीत थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

‘सरदार 2’ हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या कार्तिच्या ‘सरदार’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, दुसऱ्या भागाची कथा आणि मांडणी प्रेक्षकांना फारशी भावली नाही. 10 सप्टेंबर 2026 रोजी तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 120 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘सरदार 2’ने जगभरात केवळ 23.6 कोटी रुपयांची कमाई केली. काही ठिकाणी चित्रपटाचे शोदेखील रद्द करण्यात आले. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला.

OTTवर मात्र चित्र बदललं

थिएटरमधील खराब कामगिरीनंतर निर्मात्यांनी ‘सरदार 2’चा डिजिटल प्रवास लवकर सुरू केला. Amazon Prime Video वर 1 ऑक्टोबरपासून हा चित्रपट तमिळसोबतच तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड डबिंगमध्ये स्ट्रीम होत आहे. विशेष म्हणजे थिएटर आणि OTT रिलीजमध्ये केवळ 21 दिवसांचे अंतर राहिले.

OTTवर प्रदर्शित झाल्यानंतर मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत ‘सरदार 2’ Amazon Prime Video वरील टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत नंबर वनवर पोहोचला.

या चित्रपटात कार्तिसोबत मालाविका मोहनन, एस.जे. सूर्या, आशिका रंगनाथ, रजीशा विजयन, योगी बाबू आणि नासर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. IMDb वर ‘सरदार 2’ला 5.6 रेटिंग मिळाले आहे.

थिएटरमध्ये प्रेक्षकांनी नाकारलेला ‘सरदार 2’ OTTवर मात्र प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असल्याने ‘सप्टेंबरमध्ये पस्त, ऑक्टोबरमध्ये मस्त’ अशी या चित्रपटाची कहाणी सध्या पाहायला मिळत आहे.

Follow Us
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती