इन्स्पेक्टर फुटाणे ते बाबूलाल…सतीश शाह मराठी सिनेसृष्टीही गाजवली; अशोक सराफ, सचिन पिळगांवकर होते सहकलाकार!

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी किडनीच्या आजारामुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने नक्कीच सर्वांना धक्का बसला आहे. सतीश यांनी हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यांना उत्तम मराठी बोलता येत होतं. सतीश यांनी कोणत्या चित्रपटात काम केलं आहे जाणून घेऊयात.

इन्स्पेक्टर फुटाणे ते बाबूलाल...सतीश शाह मराठी सिनेसृष्टीही गाजवली; अशोक सराफ, सचिन पिळगांवकर होते सहकलाकार!
इन्स्पेक्टर फुटाणे ते बाबूलाल... सतीश शाह मराठी सिनेसृष्टी गाजवली; अशोक सराफ, सचिन पिळगांवकर होते सहकलाकार!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 6:51 PM

आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा तसेच आपल्या विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता सतीश शाह यांनी आज (25 ऑक्टोबर 2025) जगाचा निरोप घेतला. ही बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती. त्यांचं असं अचानक जाणं सगळ्यांसाठीच चटका लावून गेलं. ते बऱ्याच दिवसांपासून किडनीसंबंधीत आजाराने ग्रस्त होते. त्यांचे उपचारही सुरु होते, तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती असंही म्हटलं जात होतं. पण अचानक आलेल्या या धक्कादायक बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला. या बातमीमुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश यांच्यावर रविवारी म्हणजे 26 ऑक्टोबर 2025 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता मुंबईत एस.व्ही. रोड विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमी येथे केले जाणार आहेत.

1978 पासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

सतीश शहा यांनी मालिका, नाटक आणि सिनेमा या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. सतीश शहांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला. त्यांनी 1978 पासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी जवळपास 200 हून अधिक चित्रपट केले. तसेच अनेक मालिका केल्या. चित्रपटांप्रमाणेच त्यांनी मालिकांमधूनही लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. सतीश हे साराभाई व्हर्सेस साराभाई, जाने दो यारों आणि मैं हूं ना यासारख्या शोसाठी खूप लोकप्रिय होते.

मराठीशी नाळ जोडलेली

सतीश यांनी ज्यापद्धतीने हिंदी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली होती त्याचपद्धतीने त्यांची मराठीशी नाळ देखील तितकीच जोडलेली होती. त्यांना उत्तम मराठी बोलता यायचं. सतीश यांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिका तथा अभिनय तेवढाच दमदार राहिला आहे. सतीश यांनी मराठी सिनेमात देखील आपली छाप पाडली होती.

दोन गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम 

सतीश यांचे दोन गाजलेले मराठी सिनेमे म्हणजे गंमत जंमत आणि वाजवा रे वाजवा. या दोन्ही सिनेमात सतीश शाह झळकले होते. त्यांची भूमिका प्रेक्षकांनाही भावली होती. आजही ती प्रेक्षकांच्या मनात आहे.

 इन्स्पेक्टर फुटाणे आणि बाबूलाल भूमिका 

गंमत जंमतमध्ये अभिनेते सचिन पिळगावर यांच्या या सिनेमतून सतीश यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं. गंमत जंमत सिनेमात विनोदी पोलिस या सिनेमात इन्स्पेक्टर फुटाणेची भूमिका त्यांनी साकारली होती. चित्रपटात मुख्य नायिका म्हणून वर्षा उसगावकर होत्या. तसेच सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातही त्यांची भूमिका छोटीच होती पण प्रेक्षकांना हसवणारी होती.

तर दुसरा चित्रपट वाजवा रे वाजवा या चित्रपटातही त्यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात अशोक सराफही मुख्य भूमिकेत होते. तर सतीश शाह यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. बाबूलाल जैन असं त्यांच्या पात्राचे नाव होते. चित्रपटसृष्टीला सतीश शाह यांची ही कमतरता नेहमीच जाणवत राहिल.

सतीश शाह यांचे कुटुंब 

सतीश शाह यांनी 1982 मध्ये फॅशन डिझायनर मधू शाह यांच्याशी लग्न केले. वृत्तानुसार, या जोडप्याला मुले नव्हती. आयुष्यभर या जोडप्याने एकमेकांना भक्कम साथ दिली आणि सतीश यांनी याद्दल कोणत्याही मुलाखतीत यावर भाष्य केले नाही. त्यांनी नेहमी आपल्या कामालाच प्राधान्य दिलं.