Delhi Crime 2 | चाहत्यांसाठी खुशखबर… दिल्ली क्राइम वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच येणार!

| Updated on: Dec 07, 2020 | 4:44 PM

देशातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिज दिल्ली क्राइमने नुकताच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. ही वेब सीरिज २०१२ मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे. ज्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण पोलिसांचा तपास दाखवण्यात आला आहे.

Delhi Crime 2 | चाहत्यांसाठी खुशखबर... दिल्ली क्राइम वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच येणार!
Follow us on

दिल्ली : देशातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिज दिल्ली क्राइमने नुकताच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. ही वेब सीरिज २०१२ मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे. ज्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण पोलिसांचा तपास दाखवण्यात आला आहे. या वेब सिरीजमध्ये शेफाली शाह, राजेश तैलंग, रसिका दुगल आणि आदिल हुसेन मुख्य भूमिकेत होते. आता या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती राजेश तैलंग यांनी दिली आहे. (second part of the Delhi Crime Web series is coming soon)

इंडिया टुडेला बोलताना राजेश तैलंग म्हणाले एमी पुरस्कार जिंकल्यामुळे दिल्ली क्राइमच्या टिमचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. दिल्ली क्राइममध्ये इंस्पेक्टर भूपेंद्र सिंगची भूमिका साकारणारे राजेश तैलंग यांनी चाहत्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी खूप उत्साही आहे, मला खूप कॉल येत आहेत. मला याबद्दल खूप चांगले वाटते. एमी पुरस्कार दिल्ली क्राइम वेब सीरिजला मिळाला हा आनंदाचा क्षण आहे आणि त्याचे श्रेय फक्त माझे किंवा दिल्ली क्राइम टीमचे नाही तर संपूर्ण देशातील लोकांचे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचाही हा मोठा विजय आहे.

पुढे राजेश तैलंग म्हणाले की, “मी राजस्थानचा आहे, पण मी गेली 30 वर्षे दिल्लीत राहतो. मला दिल्ली माझी वाटते. मी लहानपणापासूनच इथे आहे. २०१२ मधील त्या घटनेनंतर मलाही खूप राग आला. ही घटना ज्यांनी ज्यांनी ऐकली त्या सर्वांनाच राग आला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो.

गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन २०२० मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे जास्त वाढू लागलाय. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत.  त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. पण जर ओटीटी हे आपल्या प्रादेशिक (हक्काच्या) भाषेत असतील तर…?  प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं माध्यम मिळेल, जिथे त्यांच्या भाषेतील सिनेमे हे त्यांचं दिलखुलासपणे मनोरंजन करतील. हा मुद्दा अधोरेखित करण्यामागचा उद्देश असा आहे की, मराठी प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या ओटीटीच्या माध्यमातून एक सुंदर, मनोरंजक सरप्राईज मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Durgamati | बिन रांझे की ‘हीर’ हुई मैं…या भूमी पेडणेकरच्या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली

सिनेनिर्माते नरेंद्र फिरोदिया आणि राहुल नार्वेकर यांची ओटीटी इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री!

(second part of the Delhi Crime Web series is coming soon)