अमिताभ बच्चन – जया बच्चन यांच्या लग्नाचं रहस्य, ‘ती’ अट, 5 वराती आणि… जाणून व्हाल थक्क

Amitabh Bachchan - Jaya Bachchan: अमिताभ बच्चन - जया बच्चन यांच्या लग्नाचं ते रहस्य फार कमी लोकांना आहे माहिती, एका अटीमुळे झालं दोघांचं लग्न, लग्नात आलेले फक्त 5 वराती... जाणून व्हाल थक्क

अमिताभ बच्चन - जया बच्चन यांच्या लग्नाचं रहस्य, ती अट, 5 वराती आणि... जाणून व्हाल थक्क
फाईल फोटो
| Updated on: Sep 16, 2025 | 3:38 PM

Amitabh Bachchan – Jaya Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बिग बी आणि जया बच्चन नव्या कलाकारंना प्रेरणा आणि अनेकांना कपल गोल्स देत असतात. बिग बी आणि जया बच्चन इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार आहेत. दोघांनी देखील बॉलिवूडला एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. बिग बी आणि जया बच्चन दिग्गज सेलिब्रिटी आहेत म्हणून दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं असेल… असं तुम्हाला देखील वाटत असेल. पण असं काहीही नाही. फार कमी पाहुण्याच्या उपस्थितीत बिग बी आणि जया बच्चन यांचं लग्न झालं. अत्यंत साध्या पद्धतील दोघांचं लग्न झालं. त्यांच्या वरातीत देखील फक्त 5 लोकं सामिल होते. बिग बी आणि जया बच्चन यांचं लग्न देखील घाईत झालं. यामागचं कारण जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल…

फक्त 5 पाहुण्यासोबत लग्नमंडपात पोहोचली वरात…

त्या काळात अमिताभ बच्चन यांचे सिनेमे हीट ठरत नव्हते. अशात अमिताभ बच्चन यांचा सिनेमा हीट झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी परदेशात जाऊ… असं बिग बींच्या मित्रांनी ठरवलं होतंत. 1973 मध्ये अमिताभ बच्चन स्टारर ‘जंजीर’ सिनेमा हीट ठरला. सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत जया बच्चन मुख्य भूमिकेत होत्या. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत अमिताभ बच्चन स्टार झाले.

 

 

अशात सिनेमा हीट झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लंडन याठिकाणी जायचं ठरलं. याबाबत त्यांनी वडील हरिवंश राय बच्चन यांना सांगितले. या सहलीत जया देखील अमिताभ बच्चन यांच्यासोबत जात होत्या. जया अमिताभ यांच्यासोबत जाताना पाहून वडील हरिवंश राय बच्चन यांनी अमिताभ यांच्यासमोर एक अट ठेवली.

या कारणामुळे झालं लग्न…

हरिवंश राय बच्चन म्हणाले, ‘जर तुला जयासोबत लंडनला जायचं आहे, तर सर्वांत आधी तिच्यासोबत लग्न कर…’ वडिलांची अट ऐकून अमिताभ बच्चन हैराण झाले आणि वडिलांची अट मान्य करत बिग बी यांनी लग्नासाठी होकार दिला. अशा परिस्थिती दुसऱ्याच दिवशी लग्नाची तयारी करण्यात आली… लग्नाची तयारी घाईघाईत करण्यात आली होती, त्यांच्या वरातीत फक्त 5 पाहुणे होते. लग्न अगदी साधेपणाने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं लग्न पार पडलं.