Neha Kakkar | महादेव बेटिंग ॲप प्रकरणात नेहा कक्कर हिचे पाय खोलात, थेट घेतले कोट्यवधी रुपये?

महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये बाॅलिवूड कलाकारांचे नाव आल्याने लोक हैराण झाले. या प्रकरणात कोट्यवधी रूपयांची देवाण घेवाण झालीये. महादेव बेटिंग ॲपमध्ये मोठे खुलासे काही दिवसांमध्ये होतील. ईडीच्या रडारावर अनेक कलाकार आहेत.

Neha Kakkar | महादेव बेटिंग ॲप प्रकरणात नेहा कक्कर हिचे पाय खोलात, थेट घेतले कोट्यवधी रुपये?
| Updated on: Oct 07, 2023 | 6:49 PM

मुंबई : महादेव बेटिंग ॲप प्रकरणानंतर बाॅलिवूडच्या कलाकारांनी झोप उडालीये. या प्रकरणात अत्यंत मोठे खुलासे होताना दिसतायंत. महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकणात बाॅलिवूडच्या कलाकारांचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट दिसतंय. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला ईडीकडून समन्स पाठवण्यात आलाय. इतकेच नाही तर रणबीर कपूर याने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळा मागून घेतलाय. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठे खुलासे होणार हे नक्की.

धक्कादायक बाब म्हणजे फक्त महादेव बेटिंग ॲप प्रकरणात रणबीर कपूर हाच नाही तर इतरही 15 ते 20 बाॅलिवूड कलाकारांची नावे आल्याने लोक हैराण झाले. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात रणबीर कपूर याच्यावर तर गंभीर आरोप आहेत. महादेव बेटिंग ॲपला रणबीर कपूर हा थेट प्रमोट करताना दिसला. या प्रकरणात बाॅलिवूड कलाकारांनी कोट्यवधी रूपये घेतल्याचे सांगितले जातंय.

फक्त बाॅलिवूड कलाकारच नाही तर या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात थेट बाॅलिवूडच्या गायकांचा देखील समावेश आहे. नेहा कक्कर हिचे देखील नाव या प्रकरणात आलंय. नेहा कक्कर हिने कोट्यवधी रूपये घेतल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याच्या लग्नात नेहा कक्कर ही पोहचली होती.

सौरभ चंद्राकर याच्या लग्नात थेट परफॉर्मन्स करताना देखील नेहा कक्कर ही दिसली. सौरभ चंद्राकर याने त्याच्या लग्नात पैशांची उधळण केली. या लग्नात बाॅलिवूडचे अनेक कलाकार पोहचले. या लग्नासाठी कलाकारांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सांगितले जातंय. आता नेहा कक्कर हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.

आता रणबीर कपूर याच्यानंतर नेहा कक्कर ही देखील ईडीच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जातंय. नेहा कक्कर हिला ईडीकडून समन्स पाठवला जाऊ शकतो. नेहा कक्कर हिचे नाव महादेव बेटिंग ॲप प्रकरणात आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले दिसतंय. या प्रकरणामुळे नेहा कक्कर हिच्या करिअरवर मोठा परिणाम होऊ शकतो असे सांगितले जातंय. मात्र, यावर नेहा कक्कर हिने अजूनही काही भाष्य केले नाहीये.