भारती सिंह हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, ईडीच्या निशाण्यावर, महादेव बेटिंग ॲपचे प्रकरण भोवणार
भारती सिंह ही कायमच चर्चेत असते. भारती सिंह हिने अनेक वर्षे कपिल शर्मा शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन हे केले. भारती सिंह हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, आता भारती मोठ्या वादात सापडलीये.

मुंबई : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बॉलिवूड कलाकारांसह काॅमेडियन कपिल शर्मा आणि भारती सिंह (Bharti Singh) यांची देखील नावे पुढे आलीयंत. यामुळे लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. आता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला ईडीकडून समन्स पाठवण्यात आलाय. आता यानंतर एका मागून एक ज्यांची नावे या प्रकरणात आली, त्यांना ईडीकडून (ED) समन्स पाठवला जाणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. यामुळे सर्वांच्याच अडचणीमध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.
इतकेच नाही तर महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याच्याशी या सर्वांचे कसे संबंध आले हे यांना चाैकशी सांगावे लागेल. सौरभ चंद्राकर याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी यांना किती पैसे दिले. याबद्दल देखील सर्वांची चाैकशी केली जाणार आहे. रिपोर्टनुसार या लग्नात सहभागी होण्यासाठी कलाकारांनी कोट्यवधी रूपये घेतले.
सौरभ चंद्राकर याच्या फक्त लग्नातच सहभागी होणे इतकेच नाही तर महादेव बेटिंग ॲप प्रमोट केल्याचे देखील कलाकारांवर आरोप आहेत. या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात सर्वांना पोटधरून हसवणारी भारती सिंह हिचे देखील नावे आल्याने लोक हैराण झाले. सौरभ चंद्राकर याच्या दुबईतील लग्नातील काही फोटो व्हायरल झाले.
विशेष म्हणजे या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये भारती सिंह ही दिसतंय. यावेळी पाहुण्यांसोबत गप्पा मारताना भारती सिंह ही दिसलीये. सौरभ चंद्राकर याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बाॅलिवूडच्या कलाकारांना नेमके किती पैसे दिले याबद्दल मोठा खुलासा होऊ शकतो. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणाबद्दल नुकताच भारती सिंह हिला विचारण्यात आले. यावर बोलताना भारती सिंह थेट म्हणाली की, मला या लग्नाबद्दल काहीही माहिती नाहीये. इतकेच नाही तर मी सौरभ चंद्राकर याच्या लग्नात सहभागी झाले नाही. पुढे भारती म्हणाली, कोण सौरभ मला नाही माहिती. यावेळी भारती सिंह थेट म्हणाली की, याबद्दल तुम्ही माझ्या मॅनेजरला बोला. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे देखील होऊ शकतात हे स्पष्टच आहे.
