AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahadev Betting App Case | रणबीर कपूर याच्यानंतर ‘या’ अभिनेत्याला ईडीचा समन्स? ‘हा’ अभिनेता रडारवर

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठे खुलासे होताना दिसत आहेत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांची नावे आल्याने चाहते हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या प्रकरणात आता एका अभिनेत्याला समन्स ईडीकडून पाठवण्यात आलाय.

Mahadev Betting App Case | रणबीर कपूर याच्यानंतर 'या' अभिनेत्याला ईडीचा समन्स? 'हा' अभिनेता रडारवर
| Updated on: Oct 07, 2023 | 4:18 PM
Share

मुंबई : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बॉलिवूडच्या कलाकारांची नावे पुढे आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. या प्रकरणात बाॅलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर याला समन्स पाठवण्यात आल्याने मोठी खळबळ उडालीये. रणबीर कपूर याला ईडीने 6 आॅक्टोबर रोजी चाैकशीसाठी बोलावले. मात्र, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा चाैकशीसाठी उपस्थित राहिला नाही. रणबीर कपूर याने ईडीला मेल करत काही दिवस वेळ मागितला.

आता रणबीर कपूर याच्यानंतर इतरही कलाकारांनी या प्रकरणात चाैकशी होणार हे स्पष्ट आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अनेक बाॅलिवूडच्या कलाकारांची नावे आहेत. या कलाकारांनी कोट्यवधी रूपये घेतल्याचे सांगितले जातंय. फक्त बाॅलिवूड कलाकारच नाही तर काही राजकारणी आणि काही खेळाडूंच्या नावाचा देखील समावेश आहे.

या महादेव बेटिंग ॲपचे जाळे फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील बघायला मिळतंय. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात रणबीर कपूर याच्यानंतर अभिनेता पुलकित सम्राट याला देखील ईडीने समन्स पाठवल्याचे सांगितले जातंय. रिपोर्टनुसार ईडीने पुलकित सम्राट याला समन्स पाठवलाय. मात्र, यावर बोलताना पुलकित सम्राट हा म्हणाला की, मला याबद्दल फार काही माहिती नाहीये. मलाही याबद्दल आताच कळाले.

पुढे पुलकित सम्राट म्हणाला की, मी मुंबईत आल्यानंतर या प्रकरणाबद्दल माहिती घेईल. मात्र, पुलकित सम्राट याचे हेच हे बोलणे लोकांना फार काही रूचले नसल्याचे दिसतंय. आता एका मागून एक असे ईडीकडून सर्वच कलाकारांना समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बाॅलिवूडच्या 15 ते 20 कलाकारांची नावे पुढे आलीयंत.

महादेव बेटिंग ॲप कंपनीकडून कलाकारांना कोट्यवधी रूपये दिले गेले असल्याचे सांगितले जातंय. या प्रकरणात काही वेळापूर्वीच कंगना राणावत हिच्याकडून देखील अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. आता या प्रकरणात ईडीकडून नेमकी काय कारवाई ही पुढे केली जाते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, या प्रकरणात बाॅलिवूड कलाकारांची नावे सतत येत असल्याने चाहते हे हैराण झाले आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना