ZEE मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात शबाना आझमींची एन्ट्री, सर्वांसमोर मान झुकवतं ‘त्या’ व्यक्तीची मागितली माफी
Shabana Azmi ZEE Marathi: बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीने झी मराठी पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी एका व्यक्तीची माफी मागितली.

अभिनेत्री सुलभा आर्य आणि अभिनेत्री शबाना आझमी दोघीही दिग्गज प्रसिद्ध अभिनेत्री असून या दोघींमध्ये एक नातं आहे हे बहुतेक कोणाला माहित असेल. सुलभा आर्य सध्या झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत समर राजवाडे म्हणजेच सुबोध भावेच्या आजीची नलिनी राजवाडेची भूमिका साकारतायेत.
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सुलभा आर्य यांना गौरवण्यात आले तेव्हा याच सोहळ्याला बॉलिवूड दिग्गज अभिनेत्री शबाना आझमीही आल्या होत्या. त्यांच्याच हस्ते सुलभा आर्य यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
यावेळी शबाना आझमी म्हणाल्या की, सुलभा आणि माझ्यात एक नातं आहे आणि ते म्हणजे ती माझी वहिनी आहे. कुटुंबात असं होतं की आपण इतरांचं कौतुक खूप करतो, पण आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जर कोणताही पुरस्कार मिळाला तर आपण तेवढं कौतुक नाही करत. मला खात्री आहे की मला पाहून सुलभाजीसुद्धा शॉक असणार."
"इतकी वर्षे मी तुमच्याशी भांडले, त्यासाठी मी माफी मागते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. मला तुमचा खूप खूप अभिमान आहे." असं म्हणून शबाना आझमी यांनी हात जोडून मानही झुकवली.
सुलभा आर्य यांचे पती प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर ईशान आर्य आहेत. त्यांची आई ही शबाना आझमींचे वडील कैफी आझमी यांची बहीण आहे. ईशान आर्य हे शबाना आझमींचे आत्येभाऊ असल्यान नात्याने सुलभा या शबाना यांच्या वहिनी आहेत.