
मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमधील अनेक अशा रहस्यमय गोष्टी आहे, ज्या काही वर्षांनंतर चाहत्यांच्या समोर आल्या. काही घटना चाहत्यांच्या समोर आल्यानंतर त्यांना देखील मोठा धक्का बसला. आता देखील अशीच एक गोष्ट समोर येत आहे. ज्यामुळे तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. सध्या चर्चेत असलेली घटना बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या संबंधीत आहे. महेश भट्ट यांनी अनेक सुपरहीट सिनेमे बनवले आणि असंख्य कलाकारांना फिल्म इंडस्ट्रीत संधी दिली. महेश भट्ट अनेक सिनेमे आजही चर्चेत आहेत, त्यामधील एक म्हणजे ‘अर्थ’ सिनेमा. सिनेमात अभिनेत्री शबाना आझमी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
शबाना देखील त्यांच्या सिनेमांमुळे कायम चर्चेत असतात. पण आज त्यांच्या वाढदिवस असल्यामुळे शबाना आझमी तुफान चर्चेत आल्या आहेत. एका मुलाखतीत शबाना यांनी महेश भट्ट यांच्या बद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. महेश भट्ट यांनी पाठवलेला मेसेज पाहिल्यानंतर शबाना आझमी यांच्या डोळ्यात पाणी आलं.
महेश भट्ट यांनी शबाना आझमी यांना एक ऑडिओ क्लिप पाठवली होती. ज्यांमध्ये महेश भट्ट, शबाना आझमी यांच्याबद्दल म्हणाले, ‘शबाना आझमी यांच्या शिवाय ‘अर्थ’ सिनेमा शक्य नव्हता. सिनेमाच्या यशाचं श्रेय फक्त आणि फक्त शबाना यांना जातं. सिनेमासाठी शबानाने माझ्याकडून एक रुपया देखील घेतला नव्हता. त्या मला म्हणाल्या, तुम्ही सिनेमा तयार करा, मी सिनेमासाठी सर्वकाही करण्यासाठी तयार आहे.. ‘
‘अर्थ’ सिनेमामुळे शबाना आझमी तुफान चर्चेत आल्या होत्या. एवढंच नाही तर, सिनेमासाठी अभिनेत्रीचं मोठं योगदान देखील राहिलं आहे. सिनेमाचं शुटिंग सुरु असताना शबाना आझमी इतर कलाकारांसाठी कपडे आणायच्या शिवाय त्या स्वतःचा मेकअप स्वतःच्या करायच्या.
महेश भट्ट (Mahesh Bhatt) दिग्दर्शित ‘अर्थ’ सिनेमात शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी साकरालेली भूमिका महत्त्वाची ठरली. सिनेमात शबाना आझनी यांच्यासोबत दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटिल आणि अभिनेते कुलभूषण खरबंदा मुख्य भूमिकेत होते.
नुकताच, शाबाना आझामी ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या. सिनेमात शबाना यांच्यासोबत अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या केमिस्ट्रीवर सिनेमाची कथा आधारलेली होती.