AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | 12 वर्षात इतका बदलला ‘रा.वन’ सिनेमातील प्रतीक; शाहरुख – करीना देखील नाही ओळखू शकणार

Shah Rukh Khan | 'रा.वन' सिनेमातील प्रतीक याला पाहून शाहरुख खान - करीना कपूर देखील होतील हैराण, 12 वर्षात त्याच्यात झाले मोठे बदल... फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही नाही ओळखू शकणार... आता काय करतोय 'रा.वन' सिनेमातील 'प्रतीक'

Shah Rukh Khan | 12 वर्षात इतका बदलला 'रा.वन' सिनेमातील प्रतीक; शाहरुख - करीना देखील नाही ओळखू शकणार
| Updated on: Sep 18, 2023 | 2:12 PM
Share

मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून किंग खान ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. ‘जवान’ सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसत आहे. याआधी किंग खान ‘रा.वन’ सिनेमात दुहेरी भूमिकेत झळकला होता. ‘रा.वन’ सिनेमात अभिनेता प्रथम वडिलांच्या भूमिकेत झळकला. त्यानंतर किंग खान याने ‘G. One’ या भूमिकेला न्याय दिला. सिनेमातील अभिनेत्याच्या दोन्ही भूमिकांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘रा.वन’ सिनेमात अरमान वर्मा याने शाहरुख खान याच्या मुलाची भूमिका साकारली होती. सिनेमा प्रदर्शित होवून १२ वर्ष उलटली आहेत.

१२ वर्षांनंतर अरमान शर्मा याचा लूक पूर्णपणे बदलला आहे.. सिनेमात अरमान प्रतीक या भूमिकेत दिसला. तेव्हा अरमान याच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून मोठं कौतुक झालं. पण आता अरमान मोठा झाला आहे. अरमान याला आता पाहिल्यानंतर शाहरुख आणि अभिनेत्री करीना कपूर देखील हैराण होईल. सिनेमात करीना हिने अरमान याच्या आईची भूमिका बजावली होती.

अरमान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याचा जन्म २३ मार्च १९९९ साली मुंबईत झाला होता. अरमान इन्स्टाग्रामवर सक्रिय नाही. पण फेसबूकवर अरमान कायम कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असतो. अरमान याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरमान वर्मा याची चर्चा रंगत आहे.

अरमान आता २४ वर्षांचा झाला. १२ वर्षांनंतर अरमान याला पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्याला ओळखू शकणार नाही. अरमान वर्मा याच्या कुटुंबात अनाहिता आणि शनाया या दोन बहिणी आहेत. तसेच आई आणि बाबा आहेत. अरमान वर्माने मुंबईच्या बिलबोंग हाय इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

अरमान वर्माने त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून तो लाइमलाइटपासून पूर्णपणे दूर असतो. तो सोशल मीडियावरही सक्रिय नाही. फेसबुकवर तो अधूनमधून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण आजही अरमान वर्मा याला चाहते विसरु शकलेले नाहीत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?