सलमान खानचा मुलगा होणार मोठा स्टार, शाहरुखचं मोठं वक्तव्य, चाहते थक्क

Salman Khan - Shah Rukh Khan : सलमान खान याचं झालंय लग्न? शाहरुख खान सर्वांसमोर म्हणाला, 'सलमान खान याचा मुलगा मोठा स्टार होणार...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या वक्तव्याची चर्चा...

सलमान खानचा मुलगा होणार मोठा स्टार, शाहरुखचं मोठं वक्तव्य, चाहते थक्क
फाईल फोटो
| Updated on: Oct 18, 2025 | 8:13 AM

Salman Khan – Shah Rukh Khan : अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर दोघे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य करत आहेत. अशात सलमान आणि शाहरुख यांना एकत्र पाहिल्यानंतर शाहत्यांच्या आनंद शिगेला पोहोचतो. एवढंच नाहीतर, शाहरुख, सलमान यांच्यासोबत चाहत्यांना अभिनेत आमिर खान याला देखील पाहायला आवडतं. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान एकाच मंचावर होते. यावेळी तिघांनी एकमेकांसोबत मस्ती तर केलीच, पण खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. सलमान खान याने आर्यन खान याचं कौतुक केलं. तर शाहरुख खान याने जे वक्तव्य केलं ते ऐकून सर्व हैराण झाले.

सांगायचं झालं तर, शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान नुकताच ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. आर्यन खान याचं कौतुक करत सलमान खान म्हणाला, ‘आर्यनने वेब सीरिज बनवली आहे ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ आणि ती प्रेक्षकांना आवडत आहे पण मला आर्यनला कॅमेऱ्यासमोर पाहायला आवडेल… आणि मला एक गोष्ट माहिती आहे, आर्यन त्याच्या वडिलांच्या पुढे गेला, तर सर्वात जास्त आनंद त्याच्या वडिलांना होईल…’

काय म्हणाला शाहरुख खान?

सलमान खान याने आर्यन याचं कौतुक केल्यानंतर शाहरुख खान विनोदी अंदाजात म्हणाला, ‘समलान खान याचा मुलगा झाला तर, तो सर्वात मोठा स्टार होईल… त्यमुळे आम्ही यावर काम करत आहोत…’ शाहरुख खानचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर आमिर खान देखील हसू लागतो…

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’

आर्यन खान याच्या सीरिजबद्दल सांगायचं झालं तर, किंग खानच्या मुलाने ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजच्या माध्यमातून मोठ्य पडद्यावर पदार्पण केलं आहे. सीरिजला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. सिनेमात आभिनेता बॉबी देओल, लक्ष्य ललवानी, शहर बंबा आणि राघव जुयाल यांसारख्या सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

सलमान खान याचं खासगी आयुष्य

सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींना डेट केलं आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ… यांसारख्या अनेक अभिनेत्रींना सलमान खान याने डेट केलं आहे. पण अभिनेत्याचं नातं कोणत्याच अभिनेत्रीसोबत लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज वयाच्या 59 व्या वर्षी देखील सलमान खान एकटाच आयुष्य जगत आहे.