
अख्खा ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट एकीकडे आणि रेहमान डकैत बनलेल्या अक्षय खन्नाचा (Askahaye Khanna)स्वॅग एकीकडे.. 10 दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ने सगळे रेकॉर्ड्स मोडत उत्तम कामगिरी केली आहे, बॉक्स ऑफीसवरही जोरदार गल्ला कमावला आहे. या चित्रपटातील कथनक, प्रत्येक कलाकाराचे भरभरून कौतुक होत आहेच, पण सगळ्यात जास्त हवा झालीये ती रेहमान डकैत अर्थात अक्षय खन्नाची. त्याचा स्वॅग, त्याची एंट्री, FA9LA साँगवरचं त्याचं नृत्यू, त्याच्या स्टेप्स… जळी स्थळी काष्ठी पाषाणी सध्या सगळीकडे अक्षय खन्ना याचीच चर्चा सुरू आहे.
त्याचं FA9LA हे गाणंही सगळ्यांच्या तोंडी आहे, सोशल मीडियावर अक्षयच्या गाण्याच्या क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. कित्येकांना .या गाण्याचे बोल, बीट्स एवढ्या आवडल्यात की अनेकांनी त्यावर डान्स करत आपला व्हिडीओही शूट कतरत तो सोशल मीडियावरही शेअर केला आहे. त्यातच सध्या टेक्नॉलॉजीचा , AIचा जमाना आहे. याच्या सहाय्याने कोण काय करेल सांगू शकत नाही, अनेक जण एक प्रॉम्प्ट टाकून रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांच्यासोबतचे फोट काढून शेअर करत आहेत, त्याला चांगले लाईक्सही मिळत आहेत.
धुरंधर, अक्षय खन्ना आणि शाहरुख खान..
मात्र सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ धूमाकूळ घालतोय तो किंग खानचा अर्थात शाहरूख खानचा (Shah Rukh Khan). आता तुम्ही म्हणाल धुरंधर, अक्षय खन्ना आणि शाहरुख खान यांचा एकमेकांशी काय संबंध ? तर तुम्हीही हा व्हिडीओ पहा, तो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. इन्स्टाग्राम वरील एक युजरने धुरंधरमधील FA9LA या अक्षय खन्नाच्या गाण्यात एडिटिंग केलं असून तिथे अक्षय ऐवजी शाहरुख खान हा दिसत आहे. ही क्लिप सोशल मीडियावर अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरली असून जिथे जिथे अक्षय आहे, तिथे शाहरुखचा स्वॅग पाहून नेटकरीही अचंबित झाले आहेत.
व्हिडीओ पाहिलात का ?
इन्स्टाग्रामवर sangarwa_voice या युजरने FA9LA गाण्याचं एडिटेड व्हर्जन टाकलं असून बाकी सगळे शॉट्स, लोकं तसेच आहेत. पण रेहमान डकैतच्या व्यक्तिरेखेत अक्षय खन्ना ऐवजी चक्क शाहरुख खान दिसतोय. ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर 3 हजारांपेत्रा अधिक कमेंट्स आल्या असून अक्षय खन्नाचे चाहते असलेल्या नेटकऱ्यांना तर शाहरूखची ही एंट्री बिलकूल आवडलेली नाही. मी शाहरुखचा फॅन आहे, पण अक्षय खन्ना हा फायर आहे, असं म्हणत एका चाहत्याने शाहरुखचा हा व्हिडीओ थेट नाकारला आहे.
नेटककऱ्यांच्या भरभरून कमेंट्स
यावर हजारो कमेंट्स आल्या आहेतच, त्यापैकी बहुतेकांचा सूर असाच आहे की रेहमान डकैत म्हणून शाहरुख नव्हे तर अक्षय खन्नाच शोभून दिसतोय. ‘जिसका काम उसी को साझे दूजा करे तो डंका बाजे’असं एका युजरने लिहीलं आहे. ‘ अक्षय खन्ना बेस्ट आहे, तो रोल ( रेहमान डकेत) त्याच्याशिवाय कोणीच करू शकत नाही’ असंही एका युजरने म्हटलं. ‘ जो हे वही रहने दो.. अक्षय खन्ना ‘ असं म्हणत आणखी एका युजरने शाहरुखचा व्हिडीओ चांगला वाटत नसल्याचं नमूद केलं.
पण शाहरूख्या काही चाहत्यांना मात्र हा एडिटेड व्हिडीओखूप आवडला असून त्यांनी किंग खानच्या स्वॅगचं भरभरून कौतुक केलं आहे.