Shahrukh Khan : मध्यरात्री स्वत:च्या हाताने खोदली कबर, हमसून हमसून रडला शाहरूख.. आकांत पाहून कुटुंबियही झाले सुन्न !

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. तो जितका उत्तम अभिनेता आहे, तितकाच चांगला माणूसही, म्हणूनच किंग अशी त्याची ओळख आहे. नुकताच शाहरुखशी निगडीत एक भन्नाट किस्सा उघड झाला आहे.

Shahrukh Khan : मध्यरात्री स्वत:च्या हाताने खोदली कबर, हमसून हमसून रडला शाहरूख.. आकांत पाहून कुटुंबियही झाले सुन्न !
शाहरुख खान
| Updated on: May 19, 2026 | 11:20 AM

बॉलिवूडचा बादशाह, किंग,रोमान्सचा राजा अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा स्टार अर्थात शाहरुख खान. तो अभिनेता म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे, पण माणूस म्हणून त्याचं वैयक्तिक आयुष्य तो प्रायव्हेट ठेवणंच पसंत करतो. त्याच्या आयुष्यातील फार कमी गोष्टी किंवा किस्से लोकांना, चाहत्यांना माहीत असतात, त्यांना समजतात. बॉलिवूडमधीलं सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक असलेला शाहरुख खान, त्याच्या संतुलित वागण्यासाठी आणि आलिशान जीवनासाठीही ओळखला जातो. शाहरुखने नेहमीच आपल्या कुटुंबाला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त प्राधान्य दिले आहे आणि हे त्याच्या भूमिकांमधूनही दिसून येतं, जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत.

शाहरुखप्रमाणेच त्याची पत्नी गौरी आणि मुलांबद्दलही जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते. अलीकडेच गौरीच्या एका मामांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. शाहरुखचं त्याच्या पाळीव कुत्र्यावर किती प्रेम होतं आणि त्याच्या मृत्यूमुळे तो किती व्यथित झाला होता, हे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं.

स्वत:च्या हातांनी खोदली कबर

गौरी खानच्या मामांनी मुलाखतीत सांगितलं की, गौरी त्यांची भाची आहे, त्यांनी तिला एकदा एक क्युट, छोटासा कुत्रा गिफ्ट म्हणून दिला होता. मात्र जया क्षणी तो कुत्रा मरण पावला, तेव्हा त्यांच्या स्टाफने शाहरुखला न सांगता समुद्रकिनाऱ्याजवळ विधीपूर्वक त्याला दफन केलं. मात्र त्या रात्री शाहरूख कामावरून उशीरा घरी आला आणि तेव्हाच त्याला कुत्र्याच्या मृत्यूबद्दल समजलं.  ते ऐकताच तो हादरला. मध्यरात्री 2.30 वाजता त्याने त्याच्या स्टाफला झोपेतून उठवलं आणि कुत्र्याला जिथे दफन केलं त्या जागी घेऊन जायला सांगितलं.

हमसून-हमसून रडला शाहरुख खान

मुलाखतीत गौरीचे मामा पुढे म्हणाले की- तेव्हा शाहरूखने स्वत:च्या हातांनी ती कबर उकरून काढली, त्या श्वानाचा मृतदेह बाहेर काढला. आणि नंतर त्याच्या घराच्या मागच्या बाजूला स्वत:च्या हाताने एक कबर खोदली आणि तिथे त्याला दफन केलं. तिथे त्याने एक अधिकृत मेमोरियल बनवलं, त्या रात्री तो हमसून हमसून रडला. स्टाफचीही शाहरूखने चांगलीच खरडपट्टी काढली. “माझ्या श्वानाला असं फेकण्याची तुमची हिंमत कशी झाली? तो जिवंत असो वा मृत तो इथेच राहील”, असं शाहरुखने त्यांना सुनावल्याचं, गौरीच्या मामांनी मुलाखतीत नमूद केलं

Follow Us