Pathaan | ‘पठाण’ पाहिल्यावर अबरामची प्रतिक्रिया काय होती? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख का म्हणाला ‘हे तर कर्मच’?

| Updated on: Jan 30, 2023 | 2:20 PM

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर दररोज चाहते गर्दी करत आहेत. तर ट्विटरच्या माध्यमातूनही किंग खान चाहत्यांशी संवाद साधतोय. ट्विटरवर एका चाहत्याने शाहरुखला 'पठाण' चित्रपटावर त्याच्या मुलाची प्रतिक्रिया विचारली. त्यावर शाहरुखने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.

Pathaan | पठाण पाहिल्यावर अबरामची प्रतिक्रिया काय होती? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख का म्हणाला हे तर कर्मच?
Shah Rukh Khan and Abram
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल 550 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळतोय. याशिवाय सोशल मीडियावरही ‘पठाण’चीच जोरदार चर्चा आहे. शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर दररोज चाहते गर्दी करत आहेत. तर ट्विटरच्या माध्यमातूनही किंग खान चाहत्यांशी संवाद साधतोय. ट्विटरवर एका चाहत्याने शाहरुखला ‘पठाण’ चित्रपटावर त्याच्या मुलाची प्रतिक्रिया विचारली. त्यावर शाहरुखने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.

‘सर पठाण चित्रपट पाहिल्यानंतर अबराम खानची काय प्रतिक्रिया होती’, असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुखला विचारला. त्यावर उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, ‘मला माहीत नाही कसं, पण तो म्हणाला.. पापा हे सर्व कर्मच आहे. म्हणून मला त्यावर विश्वास आहे.’

हे सुद्धा वाचा

नेमक्या किती स्क्रीप्ट्समधून पठाणची निवड करण्यात आली? पठाण हा चित्रपट बनवण्यासाठी कोण जबाबदार आहे, असाही प्रश्न एका युजरने शाहरुखला यावेळी विचारला. त्यावर त्याने लिहिलं, ‘फक्त आदित्य चोप्रा आणि सिद्धार्थ आनंद. बाकी आम्ही सर्वजण फक्त त्यांच्या सूचनांचं पालन करत होतो.’

पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेतून कमबॅक केलं आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.

पठाणने प्रदर्शनाच्या तिसऱ्याच दिवशी जगभरात 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. सर्वांत जलद गतीने इतकी कमाई करणार हा हिंदी चित्रपट ठरला. पठाणने बॉक्स ऑफिसवर कमाईचे इतरही अनेक विक्रम रचले आहेत. तर केजीएफ 2, RRR यांसारख्या चित्रपटांच्या कमाईचे विक्रम पठाणने मोडले आहेत.