
जगभरात रोमान्सचा किंग शाहरुख खानचा आज (2 नोव्हेंबर 2025) वाढदिवस आहे. त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा ‘किंग’ चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट एक स्टाइलिश आणि जबरदस्त अॅक्शन एंटरटेनर असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून थ्रिलची एका वेगळ्या प्रकारे ओळख करून दिली आहे.
आज शाहरुख खान त्याचा 59 वा वाढदिवस
आज शाहरुख खान त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि जगभरातील चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. शाहरुख खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. त्याच्या घरासमोर, मन्नतसमोर चाहत्यांची गर्दी जमते. शाहरुख खानचे केवळ देशातच नाही तर परदेशातही चाहते आहेत.
शाहरूख खानने नेम, फेम अन् प्रसिद्धी मिळवली पण सोबतच त्याने संपत्तीही तेवढीच कमावली आहे. तो अफाट संपत्ती आणि प्रसिद्धीचा मालक आहे. एवढा करोडोची संपत्ती असलेला शाहरुख खानला सतत एका गोष्टीची भीती असते.याच भीतीने तो दररोज सकाळी उठतो? शाहरुख खानने स्वतः याचा खुलासा केला आहे.
शाहरुख खानच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती
‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, शाहरुख खानने एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला होता. त्याला सकाळी उठल्यावर कशाची भीती वाटते त्याबद्दल त्याने सांगितले होते. तो म्हणाला, “एखाद्या सकाळी मी उठल्यावर माझ्याकडे देण्यासारखा काहीही नसेल. कारण मी खूप संधी सोडल्या आहेत. जर मी माझा उत्साह गमावला आणि कंटाळवाणे काम केले तर काय होईल? मला भीती वाटते की एकेदिवशी मी रडत असेल तेव्हा मात्र कोणीही माझ्यासोबत रडणार नाही. आणि मग एका सकाळी लोक म्हणतील, ‘तो एक उत्तम अभिनेता होता.’ याचा अर्थ शाहरूखला त्याच्याकडे करण्यासारखं काहीच काम नसेल तर काय होईल याची भिती वाटते. कारण त्याचं त्याच्या कामावर फार प्रेम आहे. हे त्याने अनेकदा बोलूनही दाखवलं आहे.
“या सर्व गोष्टींचा विचार मला घाबरवतात.”
शाहरुख खानला फक्त काही दिवस चालणारे चित्रपट करायचे नाहीत. तो याबद्दल एकदा म्हणाला होता, “मला आशा आहे की असा दिवस कधीच येणार नाही जेव्हा मी कंटाळून स्वतःला सांगेन, ‘ठीक आहे, मी असे नियमित चित्रपट करेन जे 40 दिवसांत पूर्ण होतील, बॉक्स ऑफिसवर हिट होतील आणि स्वतःसाठी एक नवीन कार खरेदी करण्यात मला आनंद होईल.’ या सर्व गोष्टींचे विचार मला घाबरवतात. मला भीती वाटते की जेव्हा मी उत्साह गमावेल तेव्हा मी कंटाळवाणे काम आणि चित्रपट करेन कारण मला ते करायचं नाहीये”
शाहरुख खानचा “किंग” कधी रिलीज होणार?
चित्रपटात शाहरूखचा लूक पूर्णपणे वेगळा आहे, यापूर्वी त्याचा हा लूक कधीही पाहिला गेला नसेल. हा लूक पूर्णपणे नवीन आणि वेगळा असून याच लूकने शाहरूखला प्रेक्षकांसमोर वेगळ्या रुपात सादर केलं आहे. “किंग” हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण त्याची नक्की तारीख अद्याप तरी समोर आलेली नाही.