AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रणबीर नाही, शाहरुख हाचं माझा…’, वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल, किंग खान काय म्हणाला?

चाहत्यांमध्ये किंग खान याची क्रेझ, वृद्ध महिला देखील शाहरुख याला म्हणाली, 'तुच माझा...', यावर अभिनेत्याने व्यक्त केलेली भावना चर्चेत... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

'रणबीर नाही, शाहरुख हाचं माझा...', वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल, किंग खान काय म्हणाला?
| Updated on: Feb 22, 2023 | 4:33 PM
Share

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा ‘बादशहा’ म्हणजे अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची लोकप्रियता साता समुद्र पार पोहोचली आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण किंग खान याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शाहरुख खान याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध महिला शाहरुख खान माझा क्रश असल्याचं सांगत आहे. यावर शाहरुख याने देखील उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर, किंग खान याने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

सिद्धार्थ अमित भावसर यांनी त्यांच्या बाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वृद्ध महिला चहा पिताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ त्यांच्या बा यांना गुजराती भाषेत विचारतात, ‘बा तुझा क्रश कोण आहे?’ यावर वृद्ध महिला म्हणतात, ‘पूर्वी धर्मेंद्र होते, आता शाहरुख आहे…’ यावर सिद्धार्थ पुन्हा विचारतात, ‘तुला खरंच शाहरुख आवडतो.. रणबीर, रणवीर नाही आवडत?’ यावर वृद्ध महिला म्हणतात, ‘शाहरुख याचा अभिनय आवडतो.’ शिवाय वृद्ध महिलेने शाहरुख खान याला चार्मिंग देखील म्हटलं आहे.

सिद्धार्थ अमित भावसर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर किंग खान याने देखील प्रेम व्यक्त केलं आहे. व्हिडीओ प्रेम व्यक्त करत गुजराती भाषेत अभिनेता म्हणाला, ‘बा मी देखील तुमच्यावर प्रेम करतो…’ सध्या वृद्ध महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच १५०० पेक्षा जास्त ट्विट आणि ८ हजार पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. (Shah Rukh Khan is crush of elder woman)

बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमाचा बोलबाला

पठाण’ सिनेमाने २८ व्या दिवशी १ कोटी १० लाख रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. पठाण सिनेमाने ५०० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. गेल्या २८ दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ सिनेमाने ५०० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. (box office collection of pathaan)

तर जगभरात सिनेमाने १००० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळाली. तर दुसरीकडे दीपिका पादुकोण हिने साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वत्र कौतुक झालं. (shah rukh khan starrer pathan)

सांगायचं झालं तर, अभिनेता शाहरुख खान याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे किंग खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, पण त्याचा कोणताही परिणाम बॉक्स ऑफिसवर झाला नाही.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.