AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan : हिरो बनण्याच्या नादात…नाना पाटेकरांनी शाहरुखला दिलेला मोलाचा सल्ला, अभिनेत्यानं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

Shah Rukh Khan : नाना पाटेकर यांना अनेक कलाकार श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच आता शाहरुख खाननं नाना पाटेकर यांच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Shah Rukh Khan : हिरो बनण्याच्या नादात...नाना पाटेकरांनी शाहरुखला दिलेला मोलाचा सल्ला, अभिनेत्यानं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
| Updated on: Oct 08, 2026 | 6:17 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. अनेक कलाकार नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दरम्यान, बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खाननं नाना पाटेकर यांच्यासाठी एक अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. शाहरुख खानने नाना पाटेकर यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. या भेटीनंतर अभिनेत्याचं आयुष्य आणि अभिनयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला.

शाहरुख खानची भावनिक पोस्ट

शाहरुख खानने लिहिलं, ‘जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मी घाबरलेला आणि संकोचलेला होतो आणि माझे केस सावरू लागलो. त्यांनी माझा हात झटकून दूर केला आणि म्हणाले, ‘हिरोसारखी स्टाईल मारू नकोस… तू एक अभिनेता आहेस.’ ते कौतुक करत नसत. तुम्हाला जे ऐकायचं आहे ते बोलायचे नाही, तर जे ऐकणं आवश्यक आहे ते बोलायचे. नाना असेच होते. ते स्पष्टवक्ते होते. थोडे कडक, प्रामाणिक आणि त्यांचं हास्य खूप सुंदर होतं.’

अभिनेत्याने पुढे लिहिलं, ‘प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत नेहमीच अनोखी होती. ते तुमच्यावर ओरडायचे आणि मग तिसऱ्या-चौथ्यांदा ओरडल्यावर तुमच्या लक्षात यायचं की, ते तुम्हाला मिठी मारत आहेत. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझंही त्यांच्यावर खूप प्रेम होतं. ते माझे मार्गदर्शक, शिक्षक, समीक्षक आणि मित्र होते, जे कॅरमच्या खेळात मला आणि त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला वारंवार हरवायचे आणि आपल्या विजयाचा आनंद साजरा करायचे. नाना, तुमचा उत्साह, तुमचे हास्य, तुमचा वेडेपणा आणि तुमचं प्रेम आमच्यासोबत नेहमीच राहील. मला वाटतं की, आपल्याला अजून बोलायला, अजून एक वादविवाद करायला, अजून एक कप चहा प्यायला आणि अजून एक कॅरमचा डाव खेळायला वेळ मिळाला असता तर बरं झालं असतं.’

शेवटी, शाहरुखनं लिहिलं, ‘तुम्ही केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर सर्व भारतीयांच्या आणि जगभरातील लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण केली आहे. मी फक्त एवढंच म्हणू शकतो की, तुमची खूप आठवण येईल आणि तुमचे शब्द मी माझ्या हृदयात कायम जपून ठेवीन…’हिरो बनण्याच्या नादात तुमच्यातील अभिनेता गमावू नका.’ अशी शिकवण तुम्ही दिलीत. नाना, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. एक उत्कृष्ट अभिनेते आणि एक अजिंक्य कॅरम चॅम्पियन. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमची खूप आठवण येते!! माझे हिरो अभिनेते खूप लवकर निघून गेले! RIP.’

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

नाना शाहरुख खानबद्दल काय म्हणाले?

२०२४ मध्ये लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत, नाना पाटेकर शाहरुख खानबद्दल म्हणालेले की, ‘आजही तो मला मोठ्या प्रेमाने भेटतो. लोक विसरतात, पण तो विसरलेला नाही. माझ्यासाठी तो आजही एका लहान मुलासारखा आहे. माझं त्याच्यावर खरंच प्रेम आहे.’

दरम्यान, नाना पाटेकर आणि शाहरुख खान यांनी दोन मोठ्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. १९९२ सालचा ‘राजू बन गया जेंटलमॅन’ आणि २००२ सालचा ‘शक्ती: द पॉवर’, या दोन्ही चित्रपटांना त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे आणि दोन दिग्गज कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...