
The Bads Of Bollywood: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शक म्हणून करियरची सुरुवात करत आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिज 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. बुधवारी सीरिजची स्क्रीनिंग ठेवण्यात आली. यावेळी बॉलिवूडमधील असंख्य सेलिब्रिटी उपस्थित होते. पण एका सेलिब्रिटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, आर्यन खान याची गर्लफ्रेंड लारिसा बोन्सी होती. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आर्यन खान सध्या फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे. लोरिसा हिच्यासोबत आर्यन याच्या अफेअरच्या चर्चांनी गेल्या काही महिन्यांपासून जोर धरला आहे. आता आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी देखील लारिसा पोहोचली आणि पापाराझींना पोज देत होती. सध्या लारिसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
लारिसा आणि आर्यन खान यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. न्यू ईयर पार्टी दरम्यान देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. लारिसा ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहे. लारिसा हिने अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत देखील काम केलं आहे. ‘देसी बॉयस’ सिनेमातील ‘सुबह होने न दे’ गाण्याच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शिवाय लारिसा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजमध्ये लक्ष्य ललवानी, राघव जुयाल, बॉबी देओल आणि सहर बंबा मुख्य भूमिकेत आहे. तर ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत. सीरिजमध्ये बॉलिवूड कसं आहे… हे दाखवण्याचा प्रयत्न आर्यन खान याने केला आहे. सिनेमात करण जोहर, शाहरुख खान, रणवीर सिंग, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत अन्य सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत…