AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर ईशा दोओलच्या आयुष्यात होणार नव्या पुरुषाची एन्ट्री? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

घटस्फोटानंतर ईशा देओल हिने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम आणि मुलींबद्दल अभिनेत्री मोठं वक्तव्य केलं आहे...

घटस्फोटानंतर ईशा दोओलच्या आयुष्यात होणार नव्या पुरुषाची एन्ट्री? अभिनेत्रीचा मोठा खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Sep 17, 2025 | 3:11 PM
Share

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 12 वर्षांच्या संसारानंतर ईशा देओल आणि उद्योजकल भरत तख्तानी यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्री मुलींचा सांभाळ करत आहे. तर भरत तख्तानी याने घटस्फोटानंतर रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला. भरत याने सोशल मीडियावर गर्लफ्रेंडचा फोटो पोस्ट करत ‘माझ्या कुटुंबात तुझं स्वागत…’ असं कॅप्शन लिहिलं होतं.

भरत नंतर ईशा हिने देखील खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी कायम प्रेमावर विश्वास ठेवला आहे. आयुष्यात प्रेम केलं पाहिजे… पण आयुष्यात प्रेम आणि सोबत कायम असली पाहिजे… पण सर्वकाही आयुष्यात मिळत नाही..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

पुढे ईशा हिने तिच्या मुलींबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘बॉलिवूडमध्ये माझ्या मुली पदार्पण करतील की नाही मला माहिती नाही. कारण त्या लहान आहेत आणि शिकत आहेत. त्यांना त्यांच्या आजीच्या गाण्यांवर डान्स करायला प्रचंड आवडतं. दोघी ‘धूम मचाले’ आणि ‘दिलबरा’ गाण्यावर डान्स करत असतात. मोठ्या मुलीला माझ्या आईचं ‘भूत राजा बाहर आजा’ हे गाणं प्रचंड आवडतं. ईशा सोशल मीडियावर देखील मुलींसोबत फोटो पोस्ट करत असते.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचं लग्न

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर भरत आणि ईशा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2 मुलींच्या जन्मानंतर ईशा आणि भरत विभक्त झाले. पण घटस्फोटाच्या जवळपास 18 महिन्यांनंतर भरत याने दुसऱ्या प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या सर्वत्र ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

ईशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.  सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. घटस्फोटानंतर ईशाने पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.