‘मी तोंड उघडलं तर…’, युजवेंद्र चहल – आरजे महवश यांच्या नात्याबद्दल असं काय म्हणाली धनश्री?
Yuzvendra Chahal Love Life: घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात आरजे महवश हिची एन्ट्री, पूर्व पतीच्या प्रेमसंबंधांवर असं काय म्हणाली धनश्री? एका शोमध्ये धनश्री हिने केलाय धक्कादायक खुलासा...

Yuzvendra Chahal Love Life: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये युजवेंद्र चहल याने कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2025 मध्ये युजवेंद्र आण धनश्री यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. धनश्री हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये दिसत आहे. शोमध्ये धनश्री हिने युजवेंद्र याच्यासोबत बिघडलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं.
घटस्फोटानंतर धनश्री वर्मा म्हणाली, ‘मी आता दुसऱ्या प्रेमाच्या शोधात नाही… पहिल्या लग्नातच खूप काही सहन केलं आहे. त्यामुळे पुन्हा कधीच लग्न करणार नाही…’ एवढंच नाही तर, युजवेंद्र आणि आरजे महवश यांच्या नात्याबद्दल धनश्री हिने बोलणं टाळलं. पण युजवेंद्र याच्यावर निशाणा साधला…
युजवेंद्र आणि आरजे महवश यांच्या नात्याबद्दल विचारल्यानंतर धनश्री म्हणाली, ‘मी यावर काहीही बोलणार नाही…’, पुढे अरबाज पटेलने तिला विचारलं, ‘तू युजवेंद्र याला फसवलं आहे… असं ऐकलं’, यावर धनश्री म्हणाली, ‘रंगणाऱ्या चर्चांना काहीही अर्थ नाही… सर्व खोटा पीआर आहे. मी तोंड उघडेल म्हणून…अशी भीती त्याला आहे. सर्वात आधी एखाद्या व्यक्तीला कसं दाबायचं… मी सर्वकाही सांगितलं तर, शो फारच किरकोळ वाटेल आणि आता मी त्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत… असं देखील धनश्री म्हणाली.
View this post on Instagram
‘घटस्फोटाच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत आहेत… मी शांत आहे कारण मला कोणाता अपमान करायचा नाही…’ असं देखील धनश्री म्हणाली. धनश्री सुद्धा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. घटस्फोटानंतर अनेकांनी धनश्री हिला ट्रोल देखील. सोशल मीडियावर तिच्या विरोधात अनेक पोस्ट देखील व्हायरल झाल्या.
सोशल मीडियावर धनश्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
