AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान बॉलिवूडमधून होतोय निवृत्त? किंग खानबद्दल मोठी माहिती समोर

Shah Rukh Khan : शाहरुख याचा शेवटचा सिनेमा कोणता असेल? किंग खान बॉलिवूडमधून घेणार निवृत्ती? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खान याचीच चर्चा

शाहरुख खान बॉलिवूडमधून होतोय निवृत्त? किंग खानबद्दल मोठी माहिती समोर
| Updated on: Feb 16, 2024 | 2:47 PM
Share

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याने आतापर्यंत अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. किंग खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख खान याने अनेक सिनेमे आजही चाहते तितक्याच आनंदाने पाहातात. दरम्यान, शाहरुख खान याचे अनेक सिनेमे फ्लॉर ठरले. त्यनंतर अभिनेत्याने बॉलिवूडमधून काही वर्षांचा ब्रेक घेतला आणि शाहरुख खान याने ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. ‘पठाण’ सिनेमानंतर शाहरुख खान याचे ‘जवान’, ‘डंकी’ हे दोन सिनेमे देखील हीट ठरले.

सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच शाहरुख याला निवृत्तबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्याने शेवटचा सिनेमा आणि निवृत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान आणि अभिनेत्याच्या शेवटच्या सिनेमाची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खान म्हणाला, ‘सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पुढचे 30 – 35 वर्ष निवृत्त होणार नाही. माझा शेवटचा सिनेमा हीट ठरवा आणि जगभरात सिनेमाची चर्चा असावी अशी माझी इच्छा आहे..’ एवढंच नाही तर, शाहरुख खान याने चाहत्यांना उर्दू आणि अरेबिक शिकण्याचा देखील सल्ला दिला आहे.

शाहरुख खान याचा आगामी सिनेमा

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत लेक सुहाना खान देखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा रंगली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख खान बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. सोशल मीडियावर  देखील किंग खान कायम सक्रिय असतो.  सोशल मीडियावर देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख खान चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं