
मुंबई | 23 जुलै 2023 : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना एका खास गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. रश्मिका आणि शाहिद पहिल्यांदा सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. पण यापूर्वी रश्मिका आणि शाहिद यांची अशी एक गोष्ट लिक झाली आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका आणि शाहिद यांची चर्चा रंगत आहे. रश्मिका आणि शाहिद दिग्दर्शक अनीस बज्मी दिग्दर्शित सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. अनीस बज्मी यांनी आतापर्यंत अनेक विनोदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. आता रश्मिका आणि शाहिद यांच्यावर चित्रीत कण्यात आलेला सिनेमा देखील चाहत्यांना पोट धरुन हसायला लावणारा आहे.. अशी चर्चा रंगत आहे.
रश्मिका आणि शाहिद यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु असताना, सिनेमाचं नाव लीक झालं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. रिपोर्टनुसार रश्मिका आणि शाहिद यांच्या आगामी सिनेमाचं नाव ‘एक साथ दो-दो’ असं आहे. पण याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे रश्मिका आणि शाहिद यांच्या आगामी सिनेमाची अधिकृत घोषणा निर्माते, दिग्दर्शक कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पण सिनेमाचं नाव ‘एक साथ दो-दो’ हे असेल… अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिनेमाचं नाव अधिक युनिक वाटण्यासाठी दिग्दर्शकाने अंकामध्ये सिनेमचं शिर्षक ठरल्याची चर्चा जोर धरत आहे. म्हणजे रश्मिका आणि शाहिद यांच्या आगामी सिनेमाचं नाव ‘1-7-22’ असं देखील असू शकतं. तारखेच्या आधारे सिनेमाचं शिर्षक ठरवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण सत्य नक्की काय आहे? हे सिनेमाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर समोर येईल.
महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षांनंतर विनोदी सिनेमात शाहिद कपूर झळकणार आहे. याआधी अभिनेत्याने ‘फटा पोस्टर निकला हीरो’ आणि ‘चुप चुप के’ या सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर रश्मिका हिचा तिसरा बॉलिवूड सिनेमा असणार आहे. ‘गुडबाय’, ‘मिशन मजनू’ सिनेमानंतर अभिनेत्री अनीस बज्मी यांच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.
अनीस बज्मी यांनी आतापर्यंत अनेक विनोदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘रेडी’, ‘नो एन्ट्री’, ‘वेलकम’ आणि ‘भूल भुलैया 2’ यांसारख्या सिनेमांचं अनीस बज्मी दिग्दर्शन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली आहे. ‘भूल भुलैया 2’ सिनेमाच्या यशानंतर प्रेक्षक देखील अनीस बज्मी यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.