‘सकाळी मी उठलो तेव्हा कळालं ती…’, एकीकडे शाहरुखचे स्टार होण्याचे स्वप्न, दुसरीकडे अभिनेत्रीचा खिडकीतून पडून मृत्यू

९०च्या दशकात एका अभिनेत्रीचा वयाच्या १८व्या वर्षी मृत्यू झाला होता. आता अभिनेता शाहरुख खानने त्यावर वक्तव्य केले आहे.

सकाळी मी उठलो तेव्हा कळालं ती..., एकीकडे शाहरुखचे स्टार होण्याचे स्वप्न, दुसरीकडे अभिनेत्रीचा खिडकीतून पडून मृत्यू
Shahrukh khan
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 07, 2025 | 12:53 PM

बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खान ओळखला जातो. जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एकामध्ये त्याची गणणा केली जाते. पण शाहरुखने त्याच्यासोबत काम केलेल्या एका अभिनेत्रीविषयी सांगितले आहे. ‘दीवाना’ या सिनेमामध्ये शारुख अभिनेत्री दिव्या भारतीसोबत दिसला होता. दिव्याच्या मृत्यूची आठवण करून देताना, शाहरुखने एकदा सांगितले होते की ती एक अभिनेत्री म्हणून अप्रतिम होती. शाहरुख नेहमी स्वत:ला कामात स्वस्त असणारा व्यक्ती समजायचा तर दिव्या अतिशय मस्तीखोर, भविष्याची पर्वा न करता जगणारी अभिनेत्री होती. तिच्याविषयी शाहरुखने एका मुलाखतीमध्ये सांगितले की तिच्या मृत्यूनंतर धक्का बसला होता.

शाहरुख खानने एकदा एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, “दिव्या एक पूर्णपणे मस्त आणि मजेशीर मुलगी होती. एकदा मी मुंबईतील सी रॉक हॉटेलमधून बाहेर पडत होतो, तिथे दिव्याने मला असे काहीतरी सांगितले जे माझ्या हृदयात बसले. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, ‘तू फक्त एक अभिनेता नाहीस, तू एक संस्था आहेस.’ मी हे ऐकून प्रभावित झालो… मला जाणवले की याचा अर्थ खूप मोठा आहे.”

वाचा: ‘माझ्या मांडीवर बस अन्…’, रजनीकांत-सलमानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला आला वाईट अनुभव… पळूनच गेली

दिव्याचा मृत्यू झाला तेव्हा शाहरुख दिल्लीमध्ये होता

दिव्या भारतीचा मृत्यू ५ एप्रिल १९९३मध्ये झाला. शाहरुख खानने सांगितले की, जेव्हा त्याला दिव्या भारतीच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा तो दिल्लीत होता आणि त्याला खूप मोठा धक्का बसला होता. तो म्हणाला होता, “मी तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. मी दिल्लीत झोपलो होतो आणि ते माझे ‘ऐसी दिवानगी’ गाणे वाजवत होते. मला वाटले की मी मोठा स्टार झालो आहे… सकाळी उठल्यावर कळले की ती मेली आहे. ती खिडकीतून पडली होती. हा सर्वात मोठा धक्का होता, कारण मला वाटले की मी तिच्यासोबत आणखी एक चित्रपट करणार आहे.”

दिव्या सोबत सलमानचे दोन सिनेमे

दिव्या भारतीने तिच्या करिअरची सुरुवात तामिळ चित्रपट ‘नीला पेने’ (1990) मधून केली आणि तेलुगू चित्रपट ‘बोबिली राजा’ (1990) द्वारे लोकप्रियता मिळवली. तिने ‘राउडी अल्लुडू’ (1991) मध्ये चिरंजीवी आणि ‘असेंबली राउडी’ (1991) मध्ये मोहन बाबूसोबत काम केले. तिने ‘विश्वात्मा’ (1991) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये तिच्यासोबत सनी देओल होता. यानंतर त्यांनी ‘बलवान’, ‘शोला और शबनम’, ‘दिल ही तो है’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 1992 मध्ये, तिचे 12 चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात शाहरुख खानसोबत ‘दीवाना’ आणि ‘दिल आशना है’ यांचा समावेश आहे.