शाहरुखचा मुलगा आर्यन खान या अभिनेत्रीला करतोय डेट? या सिनेमात केलंय काम
शाहरुख खान हा बॉलिवूडचा सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा मुलगा आणि मुलगी दोन्ही बॉलिवूडमध्ये य़ेणार का याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण आर्यन खान सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. ती म्हणजे तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. कोण आहे ती अभिनेत्री

Aryan Khan : शाहरुख खानची मुलगी बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच त्याचा मुलगा आर्यन खान देखील चर्चेत असतो. आर्यन खान हा वडील शाहरुख खानसोबत दिग्दर्शनमध्ये करिअर करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. किंग खानचा मुलगा बॉलिवूडमध्ये येईल की नाही माहित नाही पण त्याचा मुलगा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. आर्यन खान आयपीएल दरम्यान बऱ्याचदा मैदानावर त्याच्या टीमला सपोर्ट करताना दिसतो. पण आता तो कोणत्या अभिनेत्रीला डेट करतोय याबाबत ही चर्चा सुरु आहेत.
कोण आहे ती अभिनेत्री
मीडिया रिपोर्ट्नुसार आर्यन खान कोणत्या भारतीय अभिनेत्रीला नाही तर ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेलला डेट करत आहे. लॅरिसा बोनेसी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. लॅरिसा बोनेसी हिने गो गोवा गॉन आणि देसी बॉयज सारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकताच आर्यन खान आणि लॅरिसा बोन्सीचा एक व्हिडिओ समोर आला होता.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एक युजर असे लिहितो की, काही दिवसांपूर्वी मी रेडिटवर एक कमेंट पाहिली की आर्यन खान लारिसा बोनेसीला डेट करत आहे. तेव्हा मी आर्यनच्या इंस्टाग्रामवर पाहिले की तो लॅरिसाच्या संपूर्ण कुटुंबाला फॉलो करतो आणि लॅरिसा देखील आर्यनच्या कुटुंबाला फॉलो करते. लॅरिसाच्या आईच्या वाढदिवशी, आर्यनने खास गिफ्ट देखील पाठवले होते. लॅरिसाच्या आईने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती.’
View this post on Instagram
आर्यन खान आणि लॅरिसा बोनेसी एकमेकांना डेट करत असले तरी. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळे टीव्ही ९ देखील याला दुजोरा देत नाही. पण सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांमुळे ते दोघे चर्चेत आले आहेत.
कोण आहे लॅरिसा बोनेसी
लॅरिसा बोनेसी ही ब्राझीलची मॉडेल आहे. ती एक डान्सर देखील आहे. याआधी तिने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत “सुबाह होने ना दे” या ब्लॉकबस्टर गाण्यात काम केले आहे. तिने टायगर श्रॉफ आणि सूरज पांचोलीसोबत काही म्युझिक व्हिडिओ अल्बमही केले आहेत. ती एक चांगली डान्सर आहे. लॅरिसा बोनेसीने टॉलिवूड इंडस्ट्रीत ‘नेक्स्ट ॲनी’ आणि ‘थिक्का’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सैफ अली खानच्या ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेतून तिने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.