आहेस कोण तू… जया बच्चन यांच्या वागणुकीवर मुकेश खन्नांचा संताप, म्हणाले, ‘त्यांच्या घरातूनच काही…’

Mukesh Khanna on Jaya Bachchan: मुकेश खन्ना यांनी साधला जया बच्चन यांच्यावर निशाणा, त्यांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थितीत करत म्हणाले, 'आहेस कोण तू, काय पाहिजे आणि...', अनेकांनी साधला आहे जया बच्चन यांच्यावर निशाणा

आहेस कोण तू... जया बच्चन यांच्या वागणुकीवर मुकेश खन्नांचा संताप, म्हणाले, त्यांच्या घरातूनच काही...
| Updated on: Aug 17, 2025 | 10:10 AM

Mukesh Khanna on Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, त्यांनी राजकारणात देखील स्वतःची ओळख भक्कम केली आहे. पण जया बच्चन कायम वादाच्या भोवऱ्यात असतात. आता देखील असंच काही झालं आहे. सध्या जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फोटो क्लिक करण्यासाठी आलेल्या एक चाहत्याला त्यांनी धक्का दिला… व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला.

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्यानंतर अभिनेते मुकेश खन्ना यांनी जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला. मुकेश खन्ना म्हणाले, ‘माध्यमांसोबत त्यांचं वर्तन काही योग्य नाही. आहेस कोण तू, काय करतोय, काय हवंय… आज माध्यमांमुळे तुम्ही आहात…’

 

पुढे मुकेश खन्ना म्हणाले, ‘सध्या राज्यसभेत जया बच्चन ज्या प्रकारे बोलतात, असं वाटतं त्या बिघडल्या आहेत किंवा त्यांच्या घरातूनच काहीतरी… किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्यासाठी त्या असं करतात…’ सांगायचं झालं तर, जया बच्चन यांच्या वागणुकीवर असंख्य लोकं तिव्र संताप व्यक्त करत आहेत…

 

काय म्हणाल्या कंगना राणौत?

जया बच्चन यांच्या वागणुकीवर निराशा व्यक्त करत कंगना म्हणाल्या, ‘जया बच्चन एक बिघडलेल्या आणि विशेषाधिकारप्राप्त स्त्री आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना सगळे सहन करत आहेत…’, सध्या सर्वत्र जया बच्चन यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

अशोक पंडित यांच्याकडून नारीजी व्यक्त

निर्माते अशोक पंडित यांनीही जया बच्चन यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. पोस्ट करत ते म्हणाले ‘हे अत्यंत निंदनीय आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं,त्यांच्याबद्दल असा अपमान करणं चुकीचं आहे. एक लोकसेवक 24 तास रागावलेला राहू शकत नाहीत. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराकडून करुणेची अपेक्षा असते, कारण त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच त्यांना हे स्थान मिळाले आहे.” अनेकांनी जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.