AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 फेम शालीन भनोटची पहिली पत्नी बॉयफ्रेंडसोबत दिसली ‘या’ ठिकाणी

शालीन भनोट याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर दलजीत कौर अखेर बॉयफ्रेंडसोबत आलीच समोर; 'तो' फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण... फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

Bigg Boss 16 फेम शालीन भनोटची पहिली पत्नी बॉयफ्रेंडसोबत दिसली 'या' ठिकाणी
dalljiet kaur
| Updated on: Feb 07, 2023 | 3:32 PM
Share

Bigg Boss 16 Shalin Bhanot : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि शालीन भनोट याची पहिली पत्नी दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दलजीत कौर हिने जेव्हा दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा केला, तेव्हा पासून अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. दुसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानंतर दलजीत कौर पहिल्यांदा होणाऱ्या पतीसोबत समोर आली आहे. दलजीत कौर हिच्या होणाऱ्या पतीचं नाव निखिल पटेल (Nikhil Patel) असं आहे. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दलजीत आणि निखिल यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहेत.

फोटोमध्ये दलजीत आणि निखिल दोघे प्रचंड आनंदी दिसत आहेत. सध्या सर्वत्र दलजीत आणि निखिल यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. शालीन याची पहिली पत्नी दलजीत कौर (dalljiet kaur) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. शालीन याच्यासोबत पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zorins TV (@zorinstv)

खुद्द दलजीत कौर सोशल मीडियाच्या माध्यमातून निखिल याच्यासोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला आहे. दलजीत कौर मार्च महिन्यात दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने एक फोटो पोस्ट केला होता. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली.

कोण आहे दलजीत कौर हिचा होणारा पती? दलजीत कौर हिचा होणारा पती निखिल पटेल (nikhil patel) एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो. लग्नानंतर दलजीत कौर तिच्या आणि शालीनचा मुलगा जेडन याला देखील यूकेमध्ये घेवून जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये लग्न होणार आहे. लग्नानंतर काही दिवस दलजीत कौर नैरोबी (अफ्रीका) याठिकाणी राहणारा आहे. कारण निखिल सध्या नैरोबी याठिकाणी काम करत आहेत. त्यानंतर दलजीत कौर नव्या कुटुंबासोबत लंडन याठिकाणी शिफ्ट होणार आहे.

दलजीत कौर आणि शालीन भनोट याचं नातं दलजीत कौर आणि शालीन भनोट यांनी लग्नानंतर ६ वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दलजीत कौर आणि शालीन भनोट यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव जेडन असं आहे. नातं सुधारण्यासाठी दोघांना एकमेकांना अनेक संधी देखील दिल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एवढंच नाहीतर, दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं दलजीतने सांगितलं. शिवाय बिग बॉसमध्ये देखील अभिनेत्री टीना दत्ताने शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं सांगितलं.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान