
Love Life : झगमगत्या विश्वात अशा अनेक महिला सेलिब्रिटी आहेत ज्यांनी समाज आणि धर्माच्या पुढे जात मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. अशाच महिला सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडे… शाल्मली हिला आहे कोणत्या ओळखची गरज नाही. तिने आपल्या आवाजाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. शाल्मली हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने फरहान याला डेट केल्यानंतर लग्न केलं.
सांगायचं झालं तर, शाल्मली मराठी आहे आणि फरहान मुस्लीम आहे.. पण लग्नाचा निर्णय दोघांनी घेतल्यानंतर दोघांच्या कुटुंबियांनी देखील विरोध केला नाही. लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा दोघांनी घरी सांगितलं तेव्हा कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल नुकताच झालेल्या मुलाखतीत शाल्मली हिने मोठा खुलासा केला आहे.
शाल्मलीचा नवरा फरहान म्हणाला की, ‘माझी आणि शल्मलीचं कुटुंब धर्माबाबत फार सुरिक्षित आहे… दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नासाठी नकार दिला किंवी विरोध केला नाही….. तुम्ही हे काय करत आहात, कमीत कमी धर्मांतर तरी करुन घे… असं काहीही घडलं नाही…
पुढे शाल्मली म्हणाली, ‘मला माहिती नाही, हे माझं बोल्ड स्टेटमेंट असेल… माझ्या आईने मला दोन प्रश्न विचारली. तुम्ही एकमेकांसोबत याबाबत बोलला आहात का? तर मी तिला म्हणाले, हो आमचं बोलणं झालेलं आहे… दुसरा प्रश्न होता, ‘तुमच्यात सेक्स कसं आहे?’ त्या प्रश्नाला मी चकित झाले, आईला सांगितलं सर्वकाही चांगलं आहे… तेव्हा माझी आई देखील आमच्या लग्नासाठी तयार झाली.
शाल्मली हिच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी लोकांच्या उपस्थितीत आणि साधेपणाने शाल्मली आणि फरहान यांचं लग्न पार पडलं. 2021 मध्ये शाल्मली आणि फरहान यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले होते. शाल्मली हिने मराठी शिवाय बॉलीवूड, बंगाली, तेलुगु आणि तमिळ गाण्यासाठी आवाज दिला आहे.