AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्लाममध्ये मृत्युपत्र करण्याची…, पतीच्या गडगंज संपत्तीबद्दल शर्मिला टागोर यांचं मोठं वक्तव्य

Sharmila Tagore | तीन मुलांमध्ये संपत्तीची समान वाटणी करण्यासाठी मंसूर अली खान पतौडी यांचा मोठा निर्णय, शर्मिला टागोर म्हणाल्या, 'इस्लाममध्ये मृत्युपत्र करण्याची..., ', नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी स्वतःच्या आणि पतीच्या संपत्तीबद्दल मोठा खुलासा केला आहे... सध्या सर्वत्र पतौडी कुटुंबाची चर्चा...

इस्लाममध्ये मृत्युपत्र करण्याची..., पतीच्या गडगंज संपत्तीबद्दल शर्मिला टागोर यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Apr 03, 2024 | 9:08 AM
Share

अभिनेत्री शर्मिला टागोर भारतीय सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी 60 च्या दशकात अभिनय विश्वात पदार्पण केलं. प्रचंड कमी वयात शर्मिला टागोर यांनी काम करण्यास सुरुवात केली. फक्त संपत्तीच नाही तर, प्रसिद्ध आणि लोकप्रियता देखील मिळवली. सहा दशकांनंतर देखील चाहते शर्मिला टागोर यांना विसरु शकलेले नाहीत. आज शर्मिला टागोल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्यातरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी संपत्ती आणि इस्लाम धर्माबद्दल मोठा खुलासा केला आहे.

शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘मी जे काही खरेदी केलं आहे… माझी संपत्ती म्हणजे माझं घर, कार, दागिने… सर्व काही माझ्या नावावर आहे. यामध्ये माझ्या पतीचा कोणताच वाटा नव्हता. टायगर यांच्याकडे जे काही होतं ते त्यांचं स्वतःचं होतं. ज्यामुळे त्यांनी मृत्यूपत्र देखील तयार केलं होतं.’

शर्मिला टागोर यांनी दावा केला की इस्लाममध्ये कोणालाही मृत्युपत्र करण्याची परवानगी नाही, त्यामुळे त्यांना याबद्दल खूप विचार करावा लागला. ‘इस्लाममध्ये कोणालाही मृत्युपत्र करण्याची परवानगी नाही. जे तुमचे वारस नाहीत, त्यांना तुम्ही संपत्ती देऊ शकता. पण तुम्ही संपत्ती तुमच्या वारसांना देऊ शकत नाही. 25 टक्के, 50 टक्के… असं काही असतं…’

पुढे शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘सर्व गोष्टी समजून घेण्याची फार गरज होती. कारण आमच्याकडे खूप जमीन होती. त्यामुळे त्याची देखरेख देखील करायची होती. कोणाच्या नावावर आहे, याची खातरजमा करायची होती. मला तीन मुलं आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला समान वाटणी होईल याची काळजी घ्यायची होती..’ असं देखील शर्मिला टागोर म्हणाल्या.

मंसूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सबा, सोहा आणि सैफ अली खान अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. सांगायचं झालं तर, शर्मिला यांनी वयाच्या 16 व्या वर्षी करियरला सुरुवात केली. पण त्यांनी कधी संपत्ती किंवा पैशांमध्ये रस दाखवला नाही. पण कोविड महामारीनंतर सर्व व्यवहार शर्मिला टागोर स्वतः पाहू लागल्या.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्मिला टागोर यांची चर्चा रंगली आहे.

एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर शर्मिला टागोर यांचं राज्य होतं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत शर्मिला टागोर यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही त्यांचे अनेक सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. अनेक वर्षांनंतर शर्मिला टागोर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलमौहर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या होत्या.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.