कपिलच्या शोमध्ये शत्रुघ्न असं काही म्हणाले.. ऐकून जावई झहीर इक्बालला बसला धक्का!

सोनाक्षी तिच्या लग्नानंतर पहिल्यांदाच एका शोमध्ये पोहोचली आहे. याआधी तिने 'हिरामंडी' या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोवर हजेरी लावली होती. सोनाक्षी सिन्हाचा हा एपिसोड येत्या शनिवारी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल.

कपिलच्या शोमध्ये शत्रुघ्न असं काही म्हणाले.. ऐकून जावई झहीर इक्बालला बसला धक्का!
Zaheer Iqbal, Shatrughan Sinha and Sonakshi Sinha
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2024 | 1:19 PM

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सिझन चांगलाच चर्चेत आहे. या सिझनचे आणखी चार एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एका एपिसोडमध्ये दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे त्यांची पत्नी पूनम सिन्हा, मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि जावई झहीर इक्बाल यांच्यासोबत पोहोचले होते. हा एपिसोड नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होण्यासाठी त्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा एपिसोड अत्यंत मजेशीर आणि विनोदी असल्याचं टीझर पाहून समजतंय. यावेळी शत्रुघ्न सिन्हा असं काही म्हणतात, जे ऐकून त्यांचा जावई झहीर थक्क होतो.

या टीझरच्या सुरुवातीला सोनाक्षी मस्करीत म्हणते, “जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर कपिल शर्माच्या शोमध्ये येऊन त्याला भाऊ म्हणा.” यानंतर ती पती झहीर इक्बालची कपिलशी ओळख करून देते. “भैय्या माझ्या सैय्याला भेटा”, असं ती म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. यानंतर टीझरमध्ये शत्रुघ्न सिन्हा त्यांचा गाजलेला “खामोश” हा डायलॉग म्हणून दाखवतात. यासोबतच ते अभिनेते धर्मेंद्र यांनी दिलेला एक मजेशीर सल्ला सांगतात. “धर्मेंद्र यांनी मला एकदा सांगितलं होतं की, हे बघ.. तू या फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहेत. तुझ्यासाठी अनेक मुली वेड्या आहेत. तू नेहमी एका वेळी ‘वन-वुमन मॅन’ (एकाच मुलीसोबत) राहा”, असा किस्सा शत्रुघ्न यांनी सांगितला. त्यावर लगेच त्यांचा जावई झहीर म्हणतो, “मला वाटलं हा कौटुंबिक एपिसोड असेल. काय चाललंय?”

कपिलच्या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली अर्चना पुरण सिंह शत्रुघ्न यांच्या पत्नीला एक प्रश्न विचारते. “भांडणानंतर शत्रुघ्न यांनी कधी तुमची माफी मागितली का?” त्यावर पूनम सांगतात, “ते माफी मागतील असं तुम्हाला वाटतं का? ओह माय गॉड.. असं झालं तर खरंच तो दिवस खूप खास असेल.” यावेळी कपिलसुद्धा पूनम यांना प्रश्न विचारतो. “तुम्ही शत्रुघ्न सिन्हा यांच्या संयमासाठी किती गुण द्याल?”, असं विचारल्यावर शत्रुघ्न सिन्हा हे शंभरचा आकडा सांगतात. पण लगेच त्यावर पूनम ‘2’ इतकंच सांगतात. हे ऐकून शत्रुघ्न कपिलला म्हणतात, “मी तिला इतक्या वर्षांपासून सहन करतोय, याला संयम नाही म्हणत का?” तेव्हा प्रेक्षक जोरजोरात हसू लागतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us