गर्लफ्रेंडसोबत असल्यावर घरी असलेल्या बायकोसाठी…, विवाहबाह्य संबंधाचा शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चात्ताप

Shatrughan Sinha Love Life: गर्लफ्रेंडसोबत असल्यावर घरी असलेल्या बायकोसाठी..., विवाहित असताना देखील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीवर जडला होता शत्रुघ्न सिन्हा यांचा जीव, पश्चात्ताप व्यक्त करत म्हणाले...

गर्लफ्रेंडसोबत असल्यावर घरी असलेल्या बायकोसाठी..., विवाहबाह्य संबंधाचा शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चात्ताप
फाईल फोटो
| Updated on: May 06, 2025 | 9:10 PM

Shatrughan Sinha Love Life: दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, सिनेविश्वात देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण शत्रुघ्न सिन्हा फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहीले. एकदा शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नी पूनम सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता.

शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वीकारलं होतं की, एक काळ असा होता जेव्हा अभिनेते दोघींसोबत रिलेशनशिपमध्ये होते. ज्याचा त्यांना पश्चाताप देखील होता. पूनम सिन्हा यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा यांचं लग्न झालं होतं, तर रीना रॉय यांच्यासोबत देखील भावनिक नातं होतं.

पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत असलेल्या त्रिकुटासाठी शत्रुघ्न सिन्हा स्वतःला जबाबदार मानत होते. एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, ‘मी कधीच कोणाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यावेळी माझ्या आयुष्यात गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या होत्या. मी माझ्या चुकांमधून शिकत होतो आणि आज पूनमसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.’

पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘जेव्हा मी गर्लफ्रेंडसोबत बाहेर असायचो तेव्हा घरी असलेल्या बायकोसाठी वाईट वाटायचं आणि बायकोसोबत असायचो तेव्हा गर्लफ्रेंडसाठी वाईट वाटायचं.’ सांगायचं झालं तर एक काळ असा देखील होता जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता.

शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन देखील शेअर केली. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर देखील घेतलं. पण दोघाचं नातं फार काळ टिकलं नाही. आज शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची लेक बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलीचं नाव सोनाक्षी सिन्हा असं आहे. सोनाक्षी हिने नुकताच अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं आहे.