शेफालीच्या निधनानंतर पतीची पहिली पोस्ट; वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी!
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पती पराग त्यागीने सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहीली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 27 जून रोजी शेफालीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. ती 42 वर्षांची होती.

‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 27 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी शेफालीने या जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनाच्या सहा दिवसांनंतर पती पराग त्यागीने सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिली आहे. शेफालीचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात काय होतं, तिचं सर्वांशी नातं कसं होतं, याविषयी त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. परागने या पोस्टद्वारे त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन, असं त्याने या पोस्टच्या अखेरीस म्हटलंय. परागची ही पोस्ट वाचून नेटकरीसुद्धा भावूक झाले आहेत.
पराग त्यागीची पोस्ट-
‘शेफाली, माझी परी.. सदैव ‘कांटा लगा’ म्हणून ओळखली जाणारी.. जे फक्त डोळ्यांसमोर दिसतं त्यापेक्षा ती खूप वेगळी होती. ती नखरेनं नटलेली आग होती. तेवढीच तीक्ष्ण, एकाग्र आणि अत्यंत प्रेरित होती. एक अशी स्त्री जी हेतूपूर्वक जगली, तिने करिअर, मन, शरीर आणि आत्मा यांची शक्तीने आणि दृढनिश्चयाने काळजी घेतली. पण या सर्व कामगिरीच्या पलीकडे, शेफाली तिच्या सर्वांत निस्वार्थी स्वरुपात प्रेम होती. ती सर्वांची आई होती. नेहमी इतरांना प्राधान्य द्यायची. तिच्या उपस्थितीतून ती सर्वांना उबदार प्रेम आणि कम्फर्ट द्यायची.
View this post on Instagram
एक उदार मुलगी, एक समर्पित आणि प्रेमळ पत्नी, सिम्बाची अद्भुत आई, एक संरक्षक आणि मार्गदर्शक बहीण आणि मावशी, एक अत्यंत निष्ठावंत मैत्रीण, जी तिच्या प्रियजनांच्या पाठीशी धैर्याने आणि करुणेने उभी राहिली.
या दु:खाच्या गोंधळात, गोंगाट आणि अनुमानांनी वाहून जाणं सोपं आहे. पण शेफालीची आठवण तिच्या प्रकाशमय व्यक्तीमत्त्वाने ओळखली जायला हवी. ज्याप्रकारे तिने लोकांच्या मनात चांगली भावना निर्माण केली, जो आनंद तिने दिला, ज्या पद्धतीने तिने प्रेरणा दिली.. त्याने ती ओळखली जावी. हाच तिचा वारसा असू दे. एक तेजस्वी आत्मा, जी कधीही विसरली जाणार नाही. अनंतकाळापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन,’ असं त्याने लिहिलं आहे.
प्रार्थना बेहरे, अनिता हसनंदानी, सोफी चौधरी, दिशा परमार, राहुल देव, किश्वर मर्चंट, पारस छाब्रा, दलजीत कौर, अलीम हकीम यांसारख्या सेलिब्रिटींनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
