AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Miss Universe 2023 Winner : निकारागुआच्या शेन्निस पलासियोस हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब

यंदाच्या वर्षाची मिस युनिव्हर्स 2023 कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती निकारागुआच्या शेन्निस पलासियोस ही ठरली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त निकारागुआच्या शेन्निस पलासियोस हिची चर्चा रंगली आहे.

Miss Universe 2023 Winner : निकारागुआच्या शेन्निस पलासियोस हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब
| Updated on: Nov 19, 2023 | 11:19 AM
Share

Miss Universe 2023 Winner : मिस युनिव्हर्स 2023 च्या विजेतीच्या नावाची घोषणा अखेर झाली आहे. 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेतील निकारागुआच्या शेन्निस पलासियोस ही ठरली आहे. जगातील अनेक सुंदर मॉडेल्सना मागे टाकत शेन्निस पलासियोस हिने ‘मिस युनिव्हर्स 2023’ च्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेन्निस पलासियोस हिची चर्चा रंगली आहे. 72 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा एल साल्वाडोर येथील जोसे अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या वर्षाची मिस युनिव्हर्स 2023 कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मिस युनिव्हर्स 2023 किताब शेन्निस पलासियोस हिने जिंकला आहे.

‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी शेन्निस पलासियोस हिला शुभेच्छा दिल्या आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यामुळे शेन्निस पलासियोस आनंदी आहे. विजेती म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शेन्निस पलासियोस भावुक देखील देखील झाली.

मिस युनिव्हर्स 2022 आर बोनी गेब्रियल हिने शेन्निस पलासियोस हिला ‘मिस युनिव्हर्स 2023’ चा ताज घातला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी शेन्निस पॅलासिओस ही निकारागुआची पहिली महिला आहे. त्यामुळे ‘ब्युटी क्वीन’ हे किताब जिंकणे तिच्यासाठी देखील तेवढंच महत्त्वाचं होतं.  सध्या संपूर्ण जगात फक्त आणि फक्त शेन्निस पलासियोस हिची चर्चा रंगली आहे. शेन्निस हिचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.

‘मिस युनिव्हर्स 2023’

यावेळी मिस युनिव्हर्स निवडण्यासाठी स्पर्धकांना वेगवेगळ्या स्पर्धांचा सामना करावा लागला. संध्याकाळी गाउन आणि स्विमवेअरमध्ये देखील मॉडेल्सना परफॉर्म करावं लागलं. ‘मिस युनिव्हर्स 2023’ च्या अंतिम सोहळ्यात GRAMMY विजेते जॉन लीजेंड यांनी देखील उपस्थितांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मिस युनिव्हर्स 2023’ मध्ये तब्बल 84 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ‘मिस युनिव्हर्स 2023’ शो जवळपास 13000 लोक लाईव्ह पाहात असल्याची देखील चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा