AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला सोडून जान्हवी कपूरने उरकला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत साखरपुडा! व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी हिने मुख्यमंत्र्यांच्या नातवाला सोडून दुसऱ्याच अभिनेत्यासोबत साखरपुडा उरल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे... तर जाणून घ्या नेकमं काय आहे सत्य...

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला सोडून जान्हवी कपूरने उरकला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत साखरपुडा! व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
अभिनेत्री जान्हवी कपूर
| Updated on: Aug 30, 2026 | 7:40 AM
Share

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायमम चर्चेत असते. आता देखल जान्हवी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूर हिची चर्चा रंगली आहे. जान्हवीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदें यांच्या मुलाला डेट करत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगलेल्या. असं असताना जान्हवी हिने प्रसिद्ध अभिनेत्यासोबत साखरपुडा उरकल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सोशल मीडियावर सध्या जान्हवी कपूर आणि अभिनेता ईशान खट्टर यांचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील दोघांची केमिस्ट्री पाहिल्यानंतर त्यांनी साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे. चर्चांना उधाण आलं, कारण ईशान याचं चांजनी बेंज हिच्यासोबत ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. पण व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य नेमकं काय आहे, जाणून घ्या.

जान्हवी कपूर हिने तिच्या एक्स अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ईशान खट्टर देखील दिसत आहे. दोघांनी ‘धडक’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. आता एका व्हिडीओमध्ये दोघे नव्या जोडप्याच्या रुपात दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘जान्हवी कपूर आणि ईशान खट्टन यांना शुभेच्छा…’, असं लिहिलं आहे. सोबतच रिंग आणि हार्ट इमोजी देखील लावला आहे.

काय आहे व्हिडीओचं सत्य…

व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत, अनेकांनी म्हटलं आहे की, कोणत्या ब्रँडचं प्रमोशन असेल… व्हायरल व्हिडिओमागचे सत्य असं आहे की, हा ‘कल्की फॅशन’च्या नवीन ब्रायडल कलेक्शनच्या प्रमोशनचा एक भाग आहे. या व्हिडिओमध्ये ईशान आणि जान्हवी यांना एका जोडप्याच्या रूपात दाखवण्यात आले आहे. सध्या ही जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक